नेमकं प्रकरण घडलं कसं?
आदित्य सुनील भोसले (वय २२, रा. धर्मवीर संभाजी कॉलनी, शाहूपुरी) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आदित्यची आई आणि आजी यांनी त्यांचे सोन्याचे दागिने एका कपाटात ठेवले होते. त्यामध्ये 29 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 26 ग्रॅमच्या दोन बांगड्या, 14 ग्रॅमची बोरमाळ, पाच ग्रॅमची अंगठी, 39 ग्रॅमचे मंगळसूत्र व सात ग्रॅमची कर्णफुले व वेल, अशा दागिन्यांचा समावेश होता.
advertisement
2 वेळा पाहुणा म्हणून आला होता घरी
31 ऑगस्ट रोजी गौरीला दागिने घालण्यासाठी त्यांनी कपाट उघडले, तेव्हा त्यांना दागिने जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, ऋषिकेश हा गेल्या काही दिवसांत दोन वेळा त्यांच्या घरी येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ऋषिकेशवर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून 11 लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. विशेष म्हणजे, आरोपी ऋषिकेशवर यापूर्वीही गुन्हे दाखल असून, गोवंडी पोलिसांनी त्याला 'मोक्का' (MCOCA) लावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा : ई पीक पाहणीसंदर्भातील महत्वाची अपडेट! नोंदणीसाठी 45 दिवसांचा कालावधी मिळणार
हे ही वाचा : मिरचीचा 'तिखट' व्यवहार! रत्नागिरीत शेतकरी आणि ग्राहक हैराण, मात्र व्यापारी का होताहेत मालामाल?