TRENDING:

70 वर्षाचं वासनांध म्हातारं, शाळेला जाणाऱ्या चिमुकलीला घरी बोलावलं अन्..., बीड हादरलं!

Last Updated:

Beed News: शाळेत जाण्यापूर्वी ती रस्त्यात एका मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबली असताना 70 वर्षाच्या म्हाताऱ्याने तिला चॉकलेट देतो असे सांगून आपल्या घरात बोलावले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: बीडमधील दिंद्रुड परिसरात एका धक्कादायक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेने खळबळ उडाली आहे. चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 28 जानेवारी रोजी माजलगाव तालुक्यातील एका गावात घडली असून, या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे वय सुमारे 70 वर्षे असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे.
Beed News: 70 वर्षाचं वासनांध म्हातारं, शाळेला जाणाऱ्या चिमुकलीला घरी बोलावलं अन्..., बीड हादरलं!
Beed News: 70 वर्षाचं वासनांध म्हातारं, शाळेला जाणाऱ्या चिमुकलीला घरी बोलावलं अन्..., बीड हादरलं!
advertisement

पीडित मुलगी ही धारूर तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या शेतमजूर कुटुंबातील आहे. ती इयत्ता चौथीत शिक्षण घेत असून, नेहमीप्रमाणे 28 जानेवारी रोजी सकाळी शाळेसाठी घराबाहेर पडली होती. शाळेत जाण्यापूर्वी ती रस्त्यात एका मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबली असताना, आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो असे सांगून आपल्या घरात बोलावले. निष्पापपणाचा फायदा घेत त्याने घराचा दरवाजा आतून बंद करून मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

advertisement

नोकरीचे आमिष ठरले ...; सहशिक्षिकेच्या आयुष्याची नराधमाने केली राखरांगोळी, बीडमधील धक्कादायक प्रकार

घटनेनंतर पीडित मुलगी शाळेत गेली आणि दिवसभर कुणालाही काहीच सांगितले नाही. मात्र घरी परतल्यानंतर तिच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती अत्यंत शांत आणि भयभीत अवस्थेत राहू लागल्याने दुसऱ्या दिवशी तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण हकिगत सांगितली. आईने तात्काळ धैर्य दाखवत दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

advertisement

View More

तक्रार दाखल होताच दिंद्रुड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. आरोपी फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अंबाजोगाई परिसरातून त्याला ताब्यात घेतले. आवश्यक चौकशी पूर्ण केल्यानंतर आरोपीस केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावत बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

या प्रकरणाचा तपास पुढे सुरू असून, संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे समाजमन हादरून जात असून, लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
70 वर्षाचं वासनांध म्हातारं, शाळेला जाणाऱ्या चिमुकलीला घरी बोलावलं अन्..., बीड हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल