समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सोपान खोाब्रागडे आणि मृत महिला सुनाबाई घटारे हे ऐकमेकांच्या घरासमोर राहतात. सुनाबाई यांचा तरूण मुलगा मोहित याने खोब्रागडे यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले. हे मेसेज आणि फोटो महिलेत्या पती सोपान याने पाहिल्यानंतर त्याचा राग अनावर झाला. मेसेज का पाठवले याचा जाब विचारण्यासाठी मोहितच्या घरी गेला. मात्र, मोहित हा घरी नसल्यानं त्याची आई सुनाबाई घटारे याच्याशी सोपानचा वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्यानं सोपान खोब्रागडे यानं तरुणाची आई सुनाबाई यांना लाठीकाठीनं बेदम मारहाण केली.
advertisement
थरारक घटनेनं भंडारा हादरलं
दरम्यान, या मारहाणीत अति रक्तस्त्रावामुळं उपचारादरम्यान महिलेचा लाखांदूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही थरारक घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतपूर बारव्हा या गावात घडलीय. घटनेनंतर सोपान खोब्रागडे यांनं दिघोरी मोठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. मात्र 29 च्या सायंकाळी घडलेल्या या थरारक घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
वर्ध्याच्या देवळी शिवारात दहा हजार रुपयांसाठी युवकाची हत्या
वर्ध्याच्या देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी गहाण ठेवून घेतलेले 10 हजार रुपये युवकाने परत न केल्याच्या कारणातून सात जणांनी 28 वर्षीय युवकास काठीने बेदम मारहाण करून हत्या केली. इतकेच नाही तर मृतदेह वर्धा नदीच्या कालव्यात फेकून दिला होता. गोपाळ कुंभरे असे मृतकाचं नाव आहे. ही घटना 7 मे रोजी घडली होती. त्याची उकल चौदा दिवसांनी करत देवळी पोलिसांनी सातही जणांना अटक केली आहे.