TRENDING:

...त्याला वर पाठवू का? ‘ती’ रुममध्ये होती अन् घटस्फोटीत पती आला, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: भेटायला आलेली व्यक्ती ओळखीची असल्याचे समजून परवानगी दिली. मात्र काही वेळात दरवाजा वाजल्यानंतर समोर तो दिसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यातील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गोंधळाची घटना घडली. खासगी कामानिमित्त हॉटेलमध्ये थांबलेल्या तरुणीवर तिच्या घटस्फोट झालेल्या पतीने जबरदस्तीने घुसून मारहाण केली. शेख इर्शाद असे हिमायत बाग परिसरात राहणाऱ्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar: ...त्याला वर पाठवू का? ‘ती’ रुममध्ये होती अन् घटस्फोटीत पती आला, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा (ai photo)
Chhatrapati Sambhajinagar: ...त्याला वर पाठवू का? ‘ती’ रुममध्ये होती अन् घटस्फोटीत पती आला, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा (ai photo)
advertisement

या प्रकरणात मनाल सैय्यद मुक्तार अली (रा. प्रिया कॉलनी, पडेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास खासगी कामानिमित्त चिकलठाणा येथील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये उपस्थित होत्या. त्या वेळी त्या रूममध्ये थांबलेल्या होत्या. साडेचारच्या सुमारास रूममधील फोनवर रिसेप्शनवरून कॉल आला. ‘तुम्हाला भेटायला एक व्यक्ती आला आहे, त्याला वर पाठवू का?’ अशी विचारणा करण्यात आली.

advertisement

ज्याला भाऊजी समजून मान दिला त्यानेच मेव्हणीसोबत केलं भयानक कृत्य, पोलीसही संतापले

ओळखीचा असल्याचे समजून फिर्यादीने परवानगी दिली. मात्र काही वेळात दरवाजा वाजल्यानंतर पाहणी केली असता, समोर शेख इर्शाद (रा. हिमायत बाग, माशाअल्ला अपार्टमेंट, दिल्ली गेट) असल्याचे लक्षात आले. तो तिचा घटस्फोट झालेला पती असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

advertisement

दरम्यान, शेख इर्शाद याने हाऊसकिपरच्या मदतीने पावणेपाचच्या सुमारास रूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्याने महिलेला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या गोंधळात फिर्यादी महिला रूमच्या बाहेर आल्या. यानंतर रूममध्ये ठेवलेले फिर्यादीचे दोन मोबाईल गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे दोन्ही मोबाईल शेख इर्शाद याने चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई
सर्व पहा

चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये एक आयफोन 17 प्रो मॅक्स (किंमत अंदाजे 1 लाख रुपये) आणि दुसरा आयफोन 16 प्रो मॅक्स (किंमत सुमारे 70 हजार रुपये) असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात शेख इर्शाद याच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
...त्याला वर पाठवू का? ‘ती’ रुममध्ये होती अन् घटस्फोटीत पती आला, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल