सावकार महिलेकडे सापडलं घबाड
नुकतेच विभागीय उपनिबंधक सुरेखा फुलाटे यांनी शहरातील नंदनवन कॉलनीत धाड टाकली. यामध्ये चारुशीला प्रभाकर इंगळे या अवैध महिला सावकाराच्या घरी घबाडच सापडले. इंगळे यांच्याकडे स्टार कासव आढळले. त्यांची सावकारी गेल्या 7 वर्षांपासून सुरू होती. पण अधिकाऱ्यांना याची भणकही नव्हती. लाखोंचे प्लॉट या अवैध सावकारीच्या माध्यमातून बळकावण्यात आले होते.
advertisement
Cyber Crime: ‘गुगल’ सर्च महागात, सायबर भामट्याकडून 2 लाखांना गंडा, कशी झाली फसवणूक?
लाखाच्या कर्जावर महिला 30 हजार व्याज
एक लाख रुपयांच्या कर्जावर ही महिला सावकार 30 हजार व्याज घेत होती. घरकाम करणाऱ्या महिला, कंपनी कामगार आणि इतरही लोक या कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत. 50 महिलांचे बँक पासबुक, कोरे धनादेश, कर्जाच्या नोंदवह्या या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुरेखा फुलाटे यांच्या नेतृत्वाखाली जानेवारीपासून आतापर्यंत विविध 4 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
सुनावणीला तक्रारदार रुग्णवाहिकेतून
दुसऱ्या एका प्रकरणात बेकायदा सावकारीच्या अनुषंगाने सुनावणी सुरू आहे. या सुनावणीला तोंडाला ऑक्सिजन लावलेला तक्रारदार तालुका उपनिबंधक कार्यालयात दाखल झाला. त्यानंतर खळबळ उडाली होती. कांचनवाडी येथील सविता जैन या बेकायदा सावकारी करत असून त्यांनी 1 लाखांच्या मोबदल्यात जमीन हडप केल्याची तक्रार सुरेश फठाडे यांनी दिलीये. ते आजारी असल्याने थेट रुग्णवाहिकेतूनच सुनावणीस उपस्थित राहिले.






