धक्कादायक! 19 वर्षाच्या तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला सैतान

Last Updated:

Chhattisgarh Crime News : छत्तीसगडच्या कोरवा जिल्ह्यात एका 19 वर्षीय तरुणीवर 5 नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सामूहिक अत्याचारानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.

Chhattisgarh Crime 19 year old young woman assaulted
Chhattisgarh Crime 19 year old young woman assaulted
Woman assaulted Crime News : गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांमुळे सार्वजनिक ठिकाणच्या महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. विविध शहरांमधून समोर येणारी आकडेवारी अतिशय अस्वस्थ करणारी असून, सुरक्षिततेचा मुद्दा आता ऐरणीवर आला असतानाच आता एका 19 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच नराधम निघाल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेल्पलाईन गाडीचा चालक सहभागी

छत्तीसगडच्या कोरवा जिल्ह्यात एका 19 वर्षीय तरुणीवर 5 नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे सर्वात भयावह वास्तव म्हणजे, यात पोलिसांच्या आपत्कालीन हेल्पलाईन सेवा वाहनाचा (डायल 112) चालकही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बंकिमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, ज्या वाहनाचा उपयोग लोकांच्या मदतीसाठी केला जातो, त्याच यंत्रणेचा भाग असलेल्या व्यक्तीने हे घृणास्पद कृत्य केलं आहे.
advertisement

हिंमत दाखवून पोलिसात धाव

पीडित तरुणीला तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीने विश्वासात घेऊन फसवणुकीने एका निर्जन ठिकाणच्या घरात नेले होते. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या त्या वाहनाच्या चालकाने आणि त्याच्या इतर 4 साथीदारांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केले. मदतीसाठी कोणाला हाक मारण्याची संधीही पीडितेला मिळाली नाही. या सामूहिक अत्याचारानंतर आरोपींनी तिथून पळ काढला, मात्र पीडितेने हिंमत दाखवून पोलिसात धाव घेतली.
advertisement

पोलिसांकडून 5 आरोपींना अटक

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून, त्यात सरकारी सेवेशी संबंधित असलेल्या त्या चालकाचाही समावेश आहे. आपत्कालीन सेवेचा चालक अशा गुन्ह्यात सापडल्याने संपूर्ण छत्तीसगड पोलीस दलावर टीका होत आहे. आरोपींनी हे कृत्य करण्यासाठी ज्या जागेची निवड केली, तिथे अशा प्रकारे कोणाला फसवून नेण्याचे मोठे कट रचले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement

जलदगती खटला चालवण्याची मागणी

सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्यावर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवशाच्या व्यक्तीनेच विश्वासघात केल्याने आणि रक्षकच भक्षक बनल्याने या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
धक्कादायक! 19 वर्षाच्या तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक अत्याचार, पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला सैतान
Next Article
advertisement
ZP Election: जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टातून 'मिनी विधानसभा'बाबत मोठी अपडेट
जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर? सुप्रीम कोर्टातून 'मिनी विधानसभे'बाबत म
  • १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता

  • या प्रक्रिया पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

  • जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा नव्याने याचिका दाखल झाली

View All
advertisement