दोघांनी पाडलं, तिसऱ्याने दगडाने ठेचलं, संभाजीनगरात मंत्री अतुल सावेंच्या समर्थकाकडून अमानुष मारहाण, पाहा VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी एक्स अकाऊंटवर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीला काही जणांकडून बेदम मारहाण केली जात आहे.
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी एक्स अकाऊंटवर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीला काही जणांकडून बेदम मारहाण केली जात आहे. दोन लोक पीडित व्यक्तीला खाली पाडत आहेत. तर अन्य एक व्यक्ती दगडाने संबंधित व्यक्तीवर हल्ला करत आहे. अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ दानवे यांनी शेअर केला असून व्हिडीओमधील मारहाण करणारी व्यक्ती भाजपचे मंत्री अतुल सावे यांचा खास असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना संभाजीनगरमधील असून काही महिने आधी घडली आहे. आता हा जुना व्हिडीओ अंबादास दानवे यांनी बाहेर काढला आहे. शिवाय व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण होत आहे, ती व्यक्ती जिवंत आहे की मेली, हेही आपल्याला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
advertisement
अंबादास दानवे पोस्टमध्ये नक्की काय म्हणाले?
अंबादास दानवे यांनी एक्स अकाऊंटवर लिहिलं की, क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय... पण मंत्री अतुल सावे यांचा 'खास माणूस' असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. 'पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला?
advertisement
"ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची 'भक्ती' करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ? " असा सवालही दानवे यांनी विचारला.
क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय... पण मंत्री अतुल सावे यांचा 'खास माणूस' असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही.
'पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो… pic.twitter.com/UwN1LeQ70i
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 11, 2026
advertisement
मारहाण करणारी व्यक्ती कोण?
मिळालेल्या माहितीनुसार, दानवे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव दामू अण्णा शिंदे असं आहे. तो माजी नगरसेवक असून भाजप मंत्री अतुल सावे यांचा खास माणूस म्हणून त्याची ओळख आहे. तर ज्याला मारहाण झाली, त्या व्यक्तीचं नाव अशोक कुलकर्णी आहे. दामू शिंदे याने तीनवेळा अशोक कुलकर्णी यांना मारहाण केली होती. तिसऱ्यांदा ही क्रूर पद्धतीने दगडाने मारहाण केली.
advertisement
दानवे यांनी केलेल्या दाव्यानंतर, दामू शिंदे याने कुलकर्णी यांचं घर हडप केलं होतं. यानंतर त्याने हे घर परस्पर विकून टाकलं. याच कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे. मात्र ज्याला मारहाण झाली, ती व्यक्ती आता कुठे आहे? त्याच्यासोबत पुढे काय झालं? याची माहिती आपल्याला माहीत नसल्याचं दानवे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 9:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोघांनी पाडलं, तिसऱ्याने दगडाने ठेचलं, संभाजीनगरात मंत्री अतुल सावेंच्या समर्थकाकडून अमानुष मारहाण, पाहा VIDEO








