IND vs NZ : रोहितचा खतरनाक डाईव्ह, फिल्डिंग पाहून सगळेच शॉक,कौतूक करायला गिल बाऊंन्ड्रीवरून धावत आला VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्माने या सामन्यात एक खतरनाक डाईव्ह मारला. हा डाईव्ह इतका भारी होता की कॅप्टन गिल बाऊंन्ड्री लाईनवरून धावत त्याचं कौतुक करायला आला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
India vs New Zealand 1st Odi : वडोदराच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 300 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियासमोर 301 धावांचे आव्हान असणार आहे.या सामन्यात टीम इंडियाने खुप चांगली फिल्डिंग केली. विशेष म्हणजे रोहित शर्माने या सामन्यात एक खतरनाक डाईव्ह मारला. हा डाईव्ह इतका भारी होता की कॅप्टन गिल बाऊंन्ड्री लाईनवरून धावत त्याचं कौतुक करायला आला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर ही घटना 28 व्या ओव्हर दरम्यान घडली आहे. मोहम्मद सिराज त्यावेळेस गोलंदाजीसाठी आला होता. सिराजच्या पहिल्याच बॉलवर डेरी मिचेलने मिड विकेटनेच्या दिशेने जोरदार शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.या दरम्यान रोहित शर्माने खतरनाक डाईव्ह मारला होता. रोहित शर्माचा हा डाईव्ह पाहून चाहत्यांनी जोरदार चिअर केलं. त्याचसोबत शुभमन गिल बाऊंन्ड्री लाईनवरून धावत आला त्याच्या जोडीला सिराज देखील होता. या दोघांनी रोहितता हायफाय देऊन त्याच्या फिल्डींगची प्रशंसा केली.
advertisement
पण या दरम्यान रोहित शर्माची रिअॅक्शन वेगळीच होती. त्याच्या हावभावावरून मी इतकं मोठं काय केलं नाही असे समजत होते. पण त्याच्या डाईव्ह पाहून सगळेच शॉक झाले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोलीसने डावाची चांगली सूरूवात केली होती. दोघांनी मिळून जवळपास 117 धावांची पार्टनरशीप केली होती. त्यानंतर हर्षित राणाने डेवॉन कॉन्वेला 56 धावांवर क्लिन बोल्ड केले. तर हेन्री निकोलसला 62 धावांवर कॅच आऊट केले. त्यानंतर डेरी मिचेलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली आहे. या खेळीमुळेच न्यूझीलंड 300 धावांचा टप्पा ओलांडू शकली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट घेतले. तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
advertisement
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झाचेरी फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन आणि आदित्य अशोक.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
advertisement
भारत विरूद्ध न्यूझीलंड वनडे मालिका वेळापत्रक
पहिला वनडे सामना : 11 जानेवारी 2026, वडोदरा, दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना : 14 जानेवारी 2026, राजकोट,दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना : 18 जानेवारी 2026, इंदुर, दुपारी 1.30 वाजता
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 21 जानेवारी 2026, नागपूर संध्याकाळी 7.00 वाजता
advertisement
दुसरा टी20 सामना : 23 जानेवारी 2026, रायपूर संध्याकाळी 7.00 वाजता
तिसरा टी20 सामना : 25 जानेवारी 2026, गुवाहाटी, संध्याकाळी 7.00 वाजता
चौथा टी20 सामना : 28 जानेवारी 2026, विशाखापट्टणम,संध्याकाळी 7.00 वाजता
पाचवा टी20 सामना : 31 जानेवारी 2026, तिरूवनंतपुरम, संध्याकाळी 7.00 वाजता
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 6:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : रोहितचा खतरनाक डाईव्ह, फिल्डिंग पाहून सगळेच शॉक,कौतूक करायला गिल बाऊंन्ड्रीवरून धावत आला VIDEO









