Karjat News: पिस्तूल, काडतुसं अन् लाखो रूपयांचा दरोडा; चोरी करणारा मास्टरमाईंड असा सापडला!

Last Updated:

गोळ्या झाडून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

Karjat News: पिस्तूल, काडतुसे अन् लाखो रूपयांचा दरोडा; गोळ्या झाडून चोरी करणारा मास्टरमाईंड अटकेत
Karjat News: पिस्तूल, काडतुसे अन् लाखो रूपयांचा दरोडा; गोळ्या झाडून चोरी करणारा मास्टरमाईंड अटकेत
कर्जत: कर्जत नजीकच्या नेरळमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गोळ्या झाडून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार कैलाश ऊर्फ के. पी. (वय 54, रा. उल्हासनगर) याला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ बाजारपेठ परिसरात राबवलेल्या कारवाई दरम्यान आरोपीकडून पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि 12 लाख 91 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
6 जानेवारी 2025 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पी. डी. मेलो रोडवरील ब्ल्यू गेटसमोर हा थरारक प्रकार घडला होता. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. 3 ते 4 अनोळखी व्यक्तींनी फिर्यादींना अडवून मारहाण केली. त्यानंतर आरोपींकडील बंदुकीतून फिर्यादींच्या पुतण्यावर दोन गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यानंतर सुमारे 47 लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
advertisement
तपासादरम्यान या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार कैलाश ऊर्फ के. पी. असल्याचे निष्पन्न झाले. के. पी. सराईत गुन्हेगार असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, धुळ्यासह वेगवेगळ्या ठिकाणी के.पी.वर तब्बल 35 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवाय, नागपाडा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या मोक्का प्रकरणातही के. पी. आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आरोपीला जेरबंद करण्यात आले.
advertisement
के. पी. रायगड जिल्ह्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर नेरळ बाजारपेठ परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपीकडे नेहमीच शस्त्र असते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी अत्यंत सावध आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश साबळे आणि निरीक्षक (गुन्हे) फरीद खान यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. उपनिरीक्षक सूरज देवरे, रामप्रसाद चंदवाडे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या यशस्वी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Karjat News: पिस्तूल, काडतुसं अन् लाखो रूपयांचा दरोडा; चोरी करणारा मास्टरमाईंड असा सापडला!
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement