तयारीची शेवटची संधी, कोविडपेक्षा भयंकर संकट, थरकाप उडवणारा खुलासा; जागतिक सुरक्षेवर मोठा धोका, सर्वात अनुभवी व्यक्ती केली भीती

Last Updated:

Biological Weapons: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी गंभीर इशारा दिला आहे. एआयच्या मदतीने जैविक शस्त्रांची निर्मिती होण्याचा धोका भविष्यातील सर्वात मोठं संकट ठरू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

News18
News18
वॉशिंग्टन: जग वेगाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात प्रवेश करत असताना, या तंत्रज्ञानासोबत धोकेही तितक्याच वेगाने वाढत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी इशारा दिला आहे की एआय ही केवळ माणसाचं आयुष्य सोपं करणारी टेक्नॉलॉजी नाही; चुकीच्या हातात गेल्यास ती जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते.
advertisement
बिल गेट्स यांच्या मते, एआय समाजाला आमूलाग्र बदलणारी सर्वात प्रभावी शक्ती ठरणार आहे. मात्र जग अजूनही या बदलामुळे निर्माण होणाऱ्या जोखमींसाठी पुरेसं तयार नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की भविष्यातला सर्वात मोठा धोका नैसर्गिक महामारीपेक्षा एआयच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक शस्त्रांमधून येऊ शकतो.
advertisement
बायोटेररिझमवर थेट इशारा
आपल्या वार्षिक पत्रात (Optimism with Footnotes)बिल गेट्स यांनी लिहिलं आहे की 2015 मध्ये त्यांनी जगाला महामारीसाठी तयार नसल्याचा इशारा दिला होता आणि आज ते एआयमुळे उद्भवणाऱ्या नव्या संकटाकडे लक्ष वेधत आहेत. कोविडसारख्या महामारीसाठी जर आधीच तयारी असती, तर मानवी जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता आली असती, असं त्यांनी नमूद केलं.
advertisement
गेट्स यांच्या मते, सध्या त्याहूनही गंभीर धोका असा आहे की कोणतेही गैर-सरकारी गट ओपन सोर्स एआय टूल्सचा वापर करून जैविक शस्त्रांची रचना करू शकतात. ओपन सोर्स एआय नव्या संशोधनाला आणि नवकल्पनांना चालना देतो, हे मान्य करतानाच त्यांनी इशारा दिला की हाच मोकळेपणा चुकीच्या उद्देशाने वापरला जाऊ शकतो. त्यामुळे एआयच्या विकासावर आणि वापरावर कठोर नियंत्रण आणि स्पष्ट नियमांची नितांत गरज असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
advertisement
एआयमुळे नोकरी बाजारात मोठा बदल
एआयमुळे निर्माण होणारी दुसरी मोठी आव्हानात्मक बाब म्हणजे रोजगार क्षेत्रातील बदल. बिल गेट्स म्हणाले की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसारख्या क्षेत्रांमध्ये एआय आधीच मानवी नोकऱ्यांवर परिणाम करू लागला आहे. भविष्यात कमी मानवी मेहनतीत जास्त उत्पादन शक्य होणार आहे.
advertisement
त्यांच्या मते, गणिती दृष्टिकोनातून पाहिल्यास एआयच्या नव्या क्षमतांचा समाजाला मोठा फायदा होऊ शकतो. मात्र त्यासाठी योग्य नियोजन गरजेचं आहे. भविष्यात कामाचे तास कमी होऊ शकतात, आठवड्याचा वर्क वीक लहान होऊ शकतो आणि काही क्षेत्रांमध्ये एआयच्या वापरावर मर्यादा घालण्याचा निर्णयही घ्यावा लागू शकतो.
advertisement
2026 ‘तयारीचं वर्षबनवण्याचं आवाहन
बिल गेट्स यांनी सांगितलं की एआयचा प्रभाव सुरक्षा आणि रोजगार या दोन्ही आघाड्यांवर दिसू लागला आहे आणि पुढील पाच वर्षांत हा प्रभाव आणखी तीव्र होईल. त्यामुळे 2026 हे वर्ष एआयसाठी तयारीचं वर्ष म्हणून पाहायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला.
बिल गेट्स यांचा संदेश स्पष्ट आहे की, एआय मानवतेसाठी वरदान ठरू शकतो; पण तितकाच तो संकटाचाही स्रोत बनू शकतो. हे पूर्णपणे यावर अवलंबून आहे की जग हे तंत्रज्ञान किती समजदारीने विकसित, नियंत्रित आणि वापरते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तयारीची शेवटची संधी, कोविडपेक्षा भयंकर संकट, थरकाप उडवणारा खुलासा; जागतिक सुरक्षेवर मोठा धोका, सर्वात अनुभवी व्यक्ती केली भीती
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement