मयत संजय दुधे यांच्या पत्नी रेखा दुधे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी यापूर्वीही दोन वेळा संजय दुधे यांना मारहाण केली होती. “तुझ्या नावावरील अर्धा एकर जमीन माझ्या नावावर करून दे,” अशी मागणी करत सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पाण्यावरून वाद, 9 वर्षाच्या भावालाच संपवलं अन्...., बीडमधील ‘त्या’ प्रकरणात मोठं अपडेट
advertisement
14 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संजय दुधे हे शेतात गेले असता सामायिक विहिरीतील मोटार बाहेर काढत होते. यावरून पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले असून लहान भाऊ, वहिनी आणि दोन्ही मुलांनी मिळून लाठ्याकाठ्यांनी संजय दुधे यांना बेदम मारहाण केली. या सततच्या त्रासामुळे आणि अपमानामुळे संजय दुधे यांनी अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप पत्नी रेखा दुधे यांनी केला आहे. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या घटनेप्रकरणी गुरुवारी रात्री 9.15 वाजता पोलिसांनी लहान भाऊ राजू तान्हाजी दुधे (वय 59), भावजय लता राजू दुधे (वय 43), पुतणे संदीप राजू दुधे (वय 19) आणि दीपक राजू दुधे (वय 17, सर्व रा. यशवंतनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी राजू दुधे आणि दीपक दुधे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री 9.30 वाजता शोकाकुल वातावरणात सिल्लोड येथे संजय दुधे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. आर. कायंदे करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील चारही आरोपी संशयित असून ते फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली. उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.






