TRENDING:

Crime News : चार वर्षानंतर अखेर चिमुकलीला न्याय,जन्मदात्या आईकडूनच अवघ्या महिन्याच्या लेकीची हत्या, कारण ऐकुण कोर्टही हादरलं!

Last Updated:

रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्यात चार वर्षापूर्वी घटलेल्या एका घटनेचा आज निकाल लागला आहे.या घटनेत चार वर्षानंतर चिमुकलीला न्याय मिळाला आहे. या मुलीची तिच्याच आईने निर्घृणपणे हत्या केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Crime News : रत्नागिरी, चिपळूण, राजेश जाधव : रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्यात चार वर्षापूर्वी घटलेल्या एका घटनेचा आज निकाल लागला आहे.या घटनेत चार वर्षानंतर चिमुकलीला न्याय मिळाला आहे. या मुलीची तिच्याच आईने निर्घृणपणे हत्या केली होती. या हत्येनंतर ज्यावेळेस आईला कोर्टात हजर करण्यात आले होते, त्यावेळेस तिने हत्येमागचं जे कारण सांगितलं होतं, ते कारण ऐकूण कोर्ट देखील हादरलं आहे.त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
chiplun news
chiplun news
advertisement

अतिरिक्त सत्र न्यायालय चिपळूण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आज एक महिन्याच्या बालिकेच्या खून प्रकरणी आरोपी मातेस भा.द.वि कलम ३०२ या गुन्ह्याखाली दोषी धरून तिला आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

या गुन्ह्यातील आरोपी शिल्पा प्रविण खापले ही तिच्या दोन लहान मुली, नवरा व सासू-सासरे यांच्या सोबत चिपळूण तालुक्यातील वहाळ, घडशीवाडी येथे राहत होती. आरोपी शिल्पा हिला दोन्ही मुलीच होत्या. आरोपीला दुसऱ्या वेळी मुलगा व्हावा अशी तीव्र इच्छा होती परंतु, दुस-या वेळी देखील मुलगीच झाल्यामुळे ती नाराज होती.

advertisement

५ मार्च २०२१ रोजी तिचे पती रत्नागिरी येथे गेलेले असताना दुपारच्या सुमारास तिने तिच्या एक महिन्याच्या मुलीस घरातील पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून तिचा खून केला व शेजारचे लोक गोळा झाल्यावर बेशुध्द पडल्याचे नाटक करुन ‘ती मी नव्हेच’ असा बेबनाव केला.

सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाणेच्या पोलिसांनी आस्कमिक मृत्यू नोंद करुन चौकशी केली. परंतु, गुन्ह्याची सर्व परिस्थिती व एकूण पार्श्वभूमी विचारात घेऊन मुलीचा खूनच झाला आहे असे निष्पन्न झाल्यामुळे भा.द. वि. कलम ३०२ अन्वये सुरुवातीस अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलीस उपअधिक्षक सचिन बारी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपी माता शिल्पा प्रविण खापले हिनेच खून केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने तिच्या विरुध्द आरोपपत्र दाखल केले.

advertisement

या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांच्या समोर झाली. सरकार पक्षातर्फे अॕड. अनुपमा ठाकुर यांनी आरोपीचा गुन्हा शाबित करण्याकरिता एकूण १५ साक्षीदार तपासले. आरोपीचे दुष्कृत्य म्हणजेच एक महिन्याच्या बाळाला मुलाच्या हव्यासापोटी पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये बुडवून ठार मारुन बेबनाव करणे. या बाबी शाबित करण्यासाठी मा. सर्वोच्च व मा. उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे सादर केले. अभिलेखावरील सरकार पक्षाचा एकंदरीत साक्षीपुरावा, वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शेजारी राहणा-या साक्षीदारांनी दिलेली महत्वपूर्ण साक्ष व सखोल युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी आरोपीस दोषी धरले व भा.द.वि कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

advertisement

या केसमध्ये सरकारी वकील म्हणून ठाकुर यांनी काम पाहिले. तसेच पोलीस उपअधिक्षक  बारी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपीविरुध्द आरोपपत्र दाखल केले. या केसकामी कोर्ट पैरवी पोलीस कॉन्सटेबल म्हणून कांबळे यांनी काम पाहिले.

न्यायालयाने न्यायनिर्णय देताना मुलींबाबतचा सामाजिक दृष्टीकोन विचारात घेवून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ तसेच संविधानाने बालिकांना दिलेले घटनात्मक अधिकार याचा उल्लेख केला.  आरोपी एक महिला असून तिने मुलाच्या हव्यासापोटी स्वतःच्याच मुलीचा खून केल्यामुळे आरोपी महिलेस कठोर शिक्षा देवून स्त्री-पुरुष समानतेबाबतचा संदेश या  न्यायनिवाड्यातून दिला.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : चार वर्षानंतर अखेर चिमुकलीला न्याय,जन्मदात्या आईकडूनच अवघ्या महिन्याच्या लेकीची हत्या, कारण ऐकुण कोर्टही हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल