रेलगाव येथील चंद्रशेखर सोनवणे व लक्ष्मीबाई यांचा विवाह सहा वर्षांपूर्वी झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. दोघे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मात्र, शेतात मजुरीचे काम करताना लक्ष्मीबाईचे सूत अंभई येथील मनोज रामसिंग मुंढे याच्यासोबत जुळले. दोघांचे अनैतिक संबंध वाढत गेले. यावेळी 'तू पतीला सोडून माझ्या भावासोबत पळून जा', असे मनोज मुंढे याची बहीण मनीषा मेहेंदुले व तिचा मित्र अंकुश लक्ष्मण भागवते यांनी लक्ष्मीबाईला फितवले. यामुळे लक्ष्मीबाईने पती व मुलाला सोडून 22 जानेवारीला प्रियकर मुंढेसोबत अंभईला पळून गेली होती.
advertisement
याबाबतची तक्रार चंद्रशेखर सोनवणे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात करताच 23 जानेवारीला पोलिसांनी लक्ष्मीबाई व तिच्या प्रियकराला अटक केली. मात्र, मी माझ्या मर्जीने प्रियकरासोबत जात असल्याचे लक्ष्मीबाईने पोलिसांना सांगितले. यामुळे नैराश्यात सापडलेल्या चंद्रशेखर सोनवणे यांनी 27 जानेवारीला रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आत्महत्येपुर्वी लिहली चिठ्ठी
आत्महत्या करण्यापूर्वी चंद्रशेखर सोनवणे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात माझी पत्नी मला सोडून गेली व ती प्रियकरासोबत राहत आहे. तिने माझ्या सोबत राहण्यास नकार दिला. माझ्या मृत्यूस पत्नी व तिचा प्रियकर व इतर दोघे कारणीभूत आहेत. म्हणून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून ही चिठ्ठी जप्त केली आहे
दरम्यान या प्रकरणी मयताचे नातेवाईक योगेश पांडुरंग सुरडकर यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी पत्नी लक्ष्मीबाई चंद्रशेखर सोनवणे, पत्नीचा प्रियकर मनोज रामसिंग मुंढे (रा. अंभई, ता. सिल्लोड), प्रियकराची बहीण मनीषा गणेश मेहेंदुले (रा. रेलगाव) व मनीषाचा मित्र अंकुश लक्ष्मण भागवते या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
