झाशी, 9 डिसेंबर : गेल्या काही दिवसात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. सायबर गुन्हेगार सातत्याने आपले नेटवर्क वाढवत आहेत. ते प्रत्येक व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतात. आता सायबर गुन्हेगारांनी आपला ट्रेंड बदलला आहे. झाशीतील शेतकऱ्यांनाही टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.
सायबर गुन्हेगार विविध सरकारी योजनांच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. उत्तरप्रदेशातील झाशीमध्ये 100 हून अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रारही केली आहे.
advertisement
अशाप्रकारे झाली शेतकऱ्यांची फसवणूक -
सायबर गुन्हेगार शेतकर्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवतात. तसेच त्यांना बिनव्याजी 3000 रुपयांचे कर्ज देतात. या लिंकवर क्लिक केल्यावर एक अॅप डाउनलोड होते. शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक टाकून अॅपवर नोंदणी करताच त्यांना फोन येतो.
फोन करणार्याने शेतकर्यांना रब्बी शेतीसाठी 3000 रुपये अनुदान दिले जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँक तपशील घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून ओटीपी मागवण्यात आला आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यातून 3000 रुपये काढण्यात आले.
बँक डिटेल्स शेअर करू नका -
कृषी विभागाचे उपसंचालक एम.पी.सिंग म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कोणत्याही योजनेत अॅपची गरज नाही. अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात पोहोचते. झाशीचे एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, यामध्ये सायबर गुन्हेगारांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना आवाहन करताना ते म्हणाले की, कोणत्याही अॅपवर कोणतीही माहिती देण्यापूर्वी त्यांनी अॅप तपासले पाहिजे. तुमच्या बँकेचे तपशील कोणाशीही शेअर करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.