'हायड्रोपोनिक' गांजा म्हणजे काय?
'हायड्रोपोनिक' गांजा म्हणजे मातीचा वापर न करता, बंद आणि वातानुकूलित खोलीत उगवलेला गांजा. 'कोकोपिट' (नारळाच्या शेंड्याचा चुरा) किंवा पाण्यात पोषक द्रव्ये मिसळून याची लागवड केली जाते. यामुळे कमी वेळेत अधिक उत्पादन मिळते आणि हा गांजा सामान्य गांजापेक्षा अधिक प्रभावी असतो. त्याची नशा तीव्र असल्याने त्याला जास्त मागणी असते. मुंबईत जप्त झालेल्या एका किलो हायड्रोपोनिक गांजाची किंमत एक कोटी रुपये होती.
advertisement
परदेशातून तस्करीचा धोका
या गांजाची तस्करी प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि थायलंड यांसारख्या देशांतून होते. दोन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी दोन इंडोनेशियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून 21 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. महाराष्ट्रातील एक तरुण ऑस्ट्रेलियातून भारतात गांजा पाठवत असताना त्यालाही अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर म्हणाले की, "नशामुक्त सातारा जिल्हा मोहिमेअंतर्गत दीड वर्षांत सुमारे दीडशे किलो गांजा जप्त करून कारवाई केली आहे. आपल्या जिल्ह्यात अजूनपर्यंत हायड्रोपोनिक गांजा सापडलेला नाही, तरीही आम्ही खबरदारी घेत आहोत."
दोषींवर कठोर कारवाई
अमली पदार्थ कायद्यानुसार, कमी प्रमाणात अमली पदार्थ सापडल्यास 1 वर्षाची कैद आणि 10 हजार रुपये दंड असतो. मोठ्या प्रमाणात आढळल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि विक्रीच्या उद्देशाने बाळगल्यास 10 ते 20 वर्षांचा कारावास आणि 1 ते 2 लाख रुपये दंडाची तरतूद आहे.
हे ही वाचा : "मी मुलगा म्हणून लायक नाही", पोस्ट शेअर केली अन् ऋतुराजने संपवलं स्वतःला; मृत्यूनंतरही देहाची हेळसांड!