नामदेव बागडे असं अटक केलेल्या आरोपी वडिलांचं नाव आहे. तर रमेश बागडे असं हत्या झालेल्या 35 वर्षीय मुलाचं नाव आहे. आरोपी नामदेव बागडे हे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किडंगीपार गावात आपल्या कुटुंबीयांसह राहतात. बुधवारी रात्री उशिरा बागडे पितापुत्रांमध्ये किरकोळ वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर नराधम बापाने स्वयंपाक घरातील दगडी वरवंटा डोक्यात घालून मुलाची हत्या केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत रमेश बागडे आणि नामदेव बागडे यांचं मागील काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वारंवार खटके उडत होते. घटनेच्या दिवशी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर नामदेव यांनी घरातील स्वयंपाकगृहात असलेल्या वरवंट्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर वार केला. त्यामध्ये रमेशचा जागीच मृत्यू झाला.
मयत रमेश बागडे विवाहित असून त्यांना दोन लहान मुलं आहेत. या हत्येमुळं ही दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी नामदेव यास आमगाव पोलिसांनी अटक केली. रमेशचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे नेण्यात आला असून या घटनेच्या तपास आमगाव प्रभारी पोलीस निरीक्षक भूषण बुरडे हे करीत आहेत.