TRENDING:

Govind Barge Pooja Gaikwad: बर्गे मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती, वापरलेलं पिस्तूल कोणाचं?

Last Updated:

Govind Barge Death Case : वैराग येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: वैराग येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात अटक केलेल्या पूजा गायकवाड हिला बार्शी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने फक्त दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. यावेळी पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील लुखमसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. बर्गे यांचा मृत्यू हा आत्महत्या की घातपात, यावर संशय व्यक्त होत असताना दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्यासाठी वापरलेलं पिस्तुल कोणाचं याबाबत तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
बर्गे मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती, वापरलेलं पिस्तूल कोणाचं?
बर्गे मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती, वापरलेलं पिस्तूल कोणाचं?
advertisement

गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. या व्यवसात त्यांचा हळूहळू चांगला जम बसायला लागला होता. त्याच दरम्यान त्यांची ओळख पारगाव कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड सोबत झाली होती. त्यानंतर ही ओळख जवळीकमध्ये वाढत गेली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, प्रेमात पूजाने गोविंदकडून पैशांची मागणी सुरू केली होती. त्यानुसार गोविंदने वेळोवेळी पूजाला व तिच्या नातेवाइकांना पैसे, सोन्याचे दागिने दिले. एवढेच नव्हे, तर तिच्या भावासाठी महागडा मोबाईल व बुलेट मोटारसायकल खरेदी केली. तिच्या आईसाठी सासरच्या गावी घर बांधून दिले, तर मावशीसाठी वैराग येथे प्लॉट घेतला. याशिवाय नातेवाइकांच्या नावावर तीन एकर शेतीही विकत घेतली होती. मात्र, या सर्व गोष्टी असूनही पूजाच्या अपेक्षा वाढतच गेल्या. सततच्या दबावामुळे आणि वाढत्या तणावाखाली अखेर बर्गे यांनी आत्महत्येचे टोक गाठले.

advertisement

कोर्टात काय झालं?

सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना गायकवाडविरोधात अनेक गंभीर मुद्दे मांडले. पोलिसांनी न्यायालयाकडे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपासण्यासाठी, बँक खात्यांतील व्यवहारांचे विश्लेषण करण्यासाठी तसेच आर्थिक बाबींचा मागोवा घेण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले. याशिवाय, गायकवाडने यापूर्वी इतर कुणाला फसवले आहे का, याचाही तपास सुरू आहे.

गोविंद बर्गेंकडे असलेले पिस्तुल कोणाचं?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल त्यांच्याच मालकीचे नसल्याचे तपासातून उघड झाले आहे. संबंधित शस्त्र त्यांनी दुसऱ्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंबंधी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे वैराग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Govind Barge Pooja Gaikwad: बर्गे मृत्यू प्रकरणात पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती, वापरलेलं पिस्तूल कोणाचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल