TRENDING:

Mumbai News: जुहू किनाऱ्यावर शिर नसलेलं धड; पत्नी अन् वाहिदनं मिळून अशोकसोबत केलं हादरवणारं कांड

Last Updated:

Mumbai News: तपासादरम्यान अशोकच्या पत्नीचे वाहिदसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. अशोक हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: जुहू किनाऱ्यावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला होता. समुद्रात शिर नसलेले धड आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. मात्र सांताक्रूझ पोलिसांनी जलद हालचाल करत अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचा छडा लावला. नेमकं काय घडलं होतं? याबाबत जाणून घेऊया.
Mumbai News: जुहू किनाऱ्यावर शिर नसलेलं धड; पत्नी अन् वाहिदनं मिळून अशोकसोबत केलं हादरवणारं कांड
Mumbai News: जुहू किनाऱ्यावर शिर नसलेलं धड; पत्नी अन् वाहिदनं मिळून अशोकसोबत केलं हादरवणारं कांड
advertisement

सोमवारी समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत असलेल्या पथकाला समुद्रात वाहून आलेली एक संशयास्पद गोणी दिसली. जीवरक्षकांच्या मदतीने ती बाहेर काढून उघडण्यात आली असता त्यामध्ये अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील शिर नसलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि तपासाची सूत्रे वेगाने हलवली.

हृदयद्रावक! लेकीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातानाच काळानं गाठलं, अख्खं गाव हळहळलं

advertisement

बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासताना मालवणी परिसरातील अशोक गीड हा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोकला शेवटचे वाहिद अली शेख उर्फ मिट्ट (वय 30, रा. मालवणी) याच्यासोबत पाहण्यात आले होते. या धाग्यावरून पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरू केली.

View More

तपासादरम्यान अशोकच्या पत्नीचे वाहिदसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. अशोक हा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने आरोपीने त्याचा खून केल्याचे कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. रविवारी रात्री वाहिदने अशोकला दारू पाजली आणि तो नशेत असताना त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले व समुद्रात फेकून दिल्याचे तपासात स्पष्ट झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, फक्त 3 हजारांत सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय, आता सिद्धीची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी वाहिद अली शेख याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्ह्याचा उलगडा अल्पावधीत झाला आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Mumbai News: जुहू किनाऱ्यावर शिर नसलेलं धड; पत्नी अन् वाहिदनं मिळून अशोकसोबत केलं हादरवणारं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल