अत्याचाराची ही घटना ताजी असताना आता हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विकृतीचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका नराधमाने कॉलेजच्या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीची सोशल मीडियावर पीडित तरुणीशी ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीनं तिला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.
advertisement
याप्रकरणी पीडित तरुणीने रविवारी रात्री उशिरा हट्टा पोलीस ठाण्यात जात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या.
बालाजी उर्फ बाल्या भालेराव असं नराधम आरोपीचं नाव आहे. काही दिवसापूर्वी त्याची ओळख महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी झाली होती. त्याचं पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं. यातूनच आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. मला शरीर संबंध ठेवू दे, नाहीतर तुला जीवे मारेन, अशी धमकी आरोपीनं दिली होती. यानंतर आरोपीनं पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. रविवारी रात्री उशिरा पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.