17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 22 वर्षीय अंजली पती संदीपसोबत Roff Aalyas , सेक्टर 102, गुरुग्राम येथील फ्लॅट क्रमांक 201 मध्ये राहत होती. अंजली बीएस्सीची विद्यार्थिनी होती. गुरुवारी संदीप आपल्या बहिणीच्या घरी एका सणानिमित्त मिठाई देण्यासाठी गेला होता.
भाऊ कुणाल, वडील कुलदीप आणि आई रिंकी अंजलीच्या फ्लॅटवर पोहोचले. या लोकांनी अंजलीवर हल्ला केला. आईने अंजलीचा हात धरला, भावाने पाय धरले तर वडील कुलदीपने अंजलीचा गळा दाबला. खून केल्यानंतर तिघांनी मिळून अंजलीचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये गुपचूप ठेवला आणि गुरूग्रामहून त्यांच्या झज्जर येथील सुरती या गावी निघून गेले.
advertisement
Pandharpur News : प्रांत कार्यालयात पत्नी, मुलासमोरच तरुण शेतकऱ्याने घेतलं विष; धक्कादायक कारण समोर
ही बाब संदीपला समजताच त्याला धक्काच बसला. त्यानी तात्काळ पोलिसांना अंजलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्काराची माहिती दिली. तत्परता दाखवत पोलिसांनी अंजलीचे वडील, आई आणि भावाला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान तिघांनीही अंजलीच्या हत्येची कबुली दिली.
या प्रकरणाची माहिती देताना एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी सांगितलं की, हे प्रकरण ऑनर किलिंगचं आहे. अंजली आणि संदीप हे एकाच गावचे (सुरती) रहिवासी आहेत. अंजली जाट कुटुंबातील असून संदीप ब्राह्मण कुटुंबातील आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. 19 डिसेंबर 2022 रोजी दोघांनी मंदिरात लग्न केलं. आपल्या जीवाला धोका आहे, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे दोघेही गाव सोडून गुरुग्राममधील सेक्टर 102 मध्ये राहू लागले.
एसीपीच्या म्हणण्यानुसार, अंजलीचे कुटुंबीय या लग्नामुळे खूश नव्हते. त्यामुळे आई-वडील आणि भावाने मिळून अंजलीला मारण्याचा कट रचला. अंजलीच्या भावानेही प्रेमविवाह केला होता. यानंतर त्याने अंजली आणि संदीपशी संपर्क साधला. त्यांना विश्वासात घेऊन तोही त्या दोघांसोबत एकाच फ्लॅटमध्ये राहू लागला. 17 ऑगस्ट रोजी संदीप रोहतक येथील बहिणीच्या घरी मिठाई देण्यासाठी निघाला असता कुणालने त्याच्या पालकांना याची माहिती दिली. यानंतर आई-वडील मुलगा कुणालसह फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी मुलगी अंजलीची हत्या केली.
एसीपी पुढे म्हणाले की, अंजलीचे वडील पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करतात. त्यांनी कोणाकडे तरी मोठी गाडी मागितली होती. हत्येनंतर अंजलीचा मृतदेह याच गाडीत ठेवून गावात पोहोचवला आणि नंतर निर्जन ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
