advertisement

Pandharpur News : प्रांत कार्यालयात पत्नी, मुलासमोरच तरुण शेतकऱ्याने घेतलं विष; धक्कादायक कारण समोर

Last Updated:

Pandharpur News : पत्नी आणि लहान मुलासमोर शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण पंढरपूरमध्ये घडलं आहे.

पत्नी, मुलासमोरच तरुण शेतकऱ्याने घेतलं विष
पत्नी, मुलासमोरच तरुण शेतकऱ्याने घेतलं विष
विरेंद्र उत्पत, प्रतिनिधी
पंढरपूर, 18 ऑगस्ट : पंढरपूर प्रांत कार्यालयात कामाच्या निमित्ताने आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने काम होत नसल्याच्या नैराश्येतून विष प्राशन करून आपण जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी घडली. अक्षय काळे (रा . देवडे ता.पंढरपूर) असे विष प्राशन केलेल्या तरूणाचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेने प्रशासनाची तारांबळ उडाली. तर प्रांत कार्यालयात ही घटना घडल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
अक्षय काळे आपली पत्नी आणि लहान मुलासह येथील प्रांत कार्यालयात कामाच्या निमित्ताने आला होता. वारंवार हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने पत्नी समोरच त्याने‌ टोकाचं पाऊल‌ उचलं. अक्षय काळे याची मोहोळ तालुक्यातील शेज बाभूळगाव येथे शेती आहे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने शेती विकायला काढली आहे. विक्री करण्यासाठी त्याने प्रांत कार्यालयात परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु, शेत जमीन विक्रीची परवानगी मिळत नसल्याने आज त्याने गोचीड मारण्याचे विषारी रसायन पिऊन टोकाचं पाऊल‌ उचललं. त्याच्यावर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
मोहोळ तालुक्यातील शेतकरी अक्षय काळे यांची जमीन विक्रीची परवानगी मागण्यासाठी तहसीलदारांनी प्रांत कार्यालयाची परवानगी घेऊन या असे सूचित केले. अक्षय काळे ऊस तोडणी कामगार असून त्याच्यावर कर्ज असल्याचे समजते. यामुळं आज सकाळी प्रांत कार्यालयात येऊन जमीन विक्रीचा अर्ज दिला व त्यानंतर प्रवेशद्वारापाशीच विषारी औषध घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला.
वाचा - आईच्या चारित्र्यावर घेतला संशय; अल्पवयीन मुलाने बापाला शेतात गाठलं अन्..
अक्षय काळे याला उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. याबाबत येथील उपविभागीय अधिकारी गजानन उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Pandharpur News : प्रांत कार्यालयात पत्नी, मुलासमोरच तरुण शेतकऱ्याने घेतलं विष; धक्कादायक कारण समोर
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement