शाळेच्या सुट्टीत अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ही घटना घडली. गेल्या महिनाभरापासून शाळेच्या सुट्टीत ही चिमुकली एकटी असल्याचा फायदा घेत, शिक्षक संजय उत्तम फुंदे (रा. आनंदनगर पाथर्डी) याने तिच्यावर वेळोवेळी अश्लील वर्तन करत गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर शिक्षकाने तिला मारहाणही केल्याचे समोर आले आहे.
advertisement
तक्रार दडपण्याचा प्रयत्न
पीडित मुलीच्या पालकांनी ही बाब गावातील काही लोकांना सांगितली. मात्र, आदिनाथ रामनाथ दराडे, राजेंद्र सूर्यभान दराडे, मुनवरखान सर्वरखान पठाण आणि उमर नियाज पठाण या चौघांनी तक्रार न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. तक्रार केल्यास गावात राहू देणार नाही, अशी धमकी देऊन त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड आणि ॲड. हरिहर गर्जे पुढे आले. त्यांना हेरंब कुलकर्णी, स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे आणि शाहीन शेख यांचीही मदत मिळाली. या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रार दडपणाऱ्या चार आरोपींना अटक केली.
आरोपी शिक्षकाचा शोध सुरू
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या पथकाने या चौघांवर कारवाई केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिक्षक सध्या फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके शोधकार्य करत आहेत. या नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
हे ही वाचा : हात-पाय बांधलेले, कपडे फाटलेले... चिपळूणात निवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब!