मेघालय पोलिसांच्या तपासात राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट उघड झाला. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी दोन इंदोरमधून आणि एक उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथून अटक करण्यात आली. तर या आरोपींनी सोनमसमोर आम्ही राजाला मारल्याची कबुली दिली.
हनिमूनसाठी शिलाँग गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला होता. तर, सोनमचा थांगपत्ता लागला नव्हता. 23 मे पासून राजा बेपत्ता होता. तर, 2 जून रोजी त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात राजाची हत्या झाल्याचे समोर आले होते. मात्र, सोनम बेपत्ता असल्याने या प्रकरणातील गूढ वाढले. पोलिसांकडून सोनमचा शोध सुरू होता. अखेर तिने घरच्या लोकांना फोन करून गाझियाबादमधील आपलं लोकेशन सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेत तिला अटक केली.
advertisement
सोनमचं हादरवणारं सत्य...
सोनमच्या वडिलांचं व्यवसाय होता. शिक्षणानंतर ती देखील या व्यवसायात हातभार लावू लागली. त्याचवेळी तिचे आणि गोदामाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या राज कुशवाहसोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू झाले. राज या हत्या प्रकरणात आरोपी आहे. वडिलांच्या व्यवसायातून सर्व खर्च भागवून जेमतेम कमाई होत असल्याचे तपासात समोर आले. मात्र, अचानकपणे त्यांच्या कमाईत वाढ झाली. त्याचे कारण समोर आले आहे.
सोनमचं आणखी एक कांड समोर...
सोनम रघुवंशी ही हवालामध्ये गुंतली असल्याचे समोर आले आहे. सोनमच्या हाती या हवालाचा सगळा कारभार होता. सोनमकडे 20 लाख रुपये होते. तिच्या भावाने 20 लाखांचा हिशोब मागितला तेव्हा, लग्नात खर्च झाल्याचे तिने सांगितले. राजाच्या हत्येत हीच रक्कम वापरल्याचा संशय आहे. सोनमने मारेकऱ्यांना 20 लाखांची सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. हवालाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर सोनमच्या घरची आर्थिक स्थिती चांगली झाल्याचे समोर आले आहे. तिने नवीन घर, प्लॉट आणि गाडी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीत चार बँक खाती सापडली आहेत. त्याचीही चौकशी सुरू आहे. हे चार बँक अकाउंट देवास येथील जितेंद्र रघुवंशीच्या नावावर आहे. हे चालू खाते असून या खात्यावरुन लाखो रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आता पोलीस जितेंद्रचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे 23 मे रोजी शिलाँगमध्ये राजाची हत्या झाल्यानंतर सोनमने आर्थिक व्यवहारासाठी याच खात्याचा वापर केला.
पोलिसांनी राज आणि सोनम या दोन्ही आरोपींचे व्हॉट्स अॅप चॅट रिकव्हर केले आहेत. राजच्या फोनमधून कोटी रुपयांच्या हवालाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. राजने हवालातील एका व्यक्तीकडून 50 हजार रुपये घेतले होते. 50 हजार रुपये देऊनच राजने मारेकऱ्यांना शिलाँगला पाठवले होते. त्याशिवाय, सोनम ही राजच्या पेटीएमचा वापर करत होती. हनिमूनसाठी बुकिंगदेखील राजच्या पेटीएममधून केली असल्याचे समोर आले.