मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बँकेत गेला होता. त्याने बँकेतून पैसे काढले आणि ते मोजत होता. त्याला आकडे काही लागेना. त्यामुळे तो पुन्हा मोजत होता. शेतकऱ्याची ही अवस्था पाहून त्याचा फायदा तरुणाने उचलला. हा तरुण शेतकऱ्याजवळ आला आणि म्हणाला बाबा द्या मी मोजून देतो. त्याचे हे शब्द ऐकून एक क्षण गोंधळलेल्या शेतकऱ्याला धीर आला.
advertisement
त्या शेतकऱ्याला काय माहिती की या गोड शब्दांमध्ये किती मोठा चोर दडला आहे ते. त्याने अगदी भोळेपणाने आपल्या हातातले पैसे त्याला मोजायला दिले. त्याच चोराने अगदी हातचालाखीने शेतकऱ्याचे पैसे लाटले आणि पँटच्या खिशात भरुन तो बँकेतून पसार झाला. याचा संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
ही धक्कादायक घटना जळगावच्या सावदा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत वयोवृद्ध शेतकऱ्याने काढलेले पैसे मोजत असताना बँकेत एका तरुणाने मी पैसे मोजून देतो बाबा असे म्हणत त्याने हात चलातीने 50 हजार पैकी 10 हजार 500 रुपये लांबवल्याची घटना घडली आहे.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे . या घटनेमुळे बँकेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.