चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील तरुणांनी एकत्र येत दारूची पार्टी केली. पार्टी केल्याची गोष्ट त्यातीलच एकाने मित्रांच्या घरी सांगितल्याचा राग मनात ठेवत 4 ते 5 जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात लाकडी दांडक्यांनी जोरात दणके देण्यात आले. यात जखमी झालेल्या दादा बारकू ठाकूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दादा ठाकूर आणि काहीजणांनी 2-4 दिवसांपूर्वी पार्टी केली. मात्र दादा ठाकूर यानेच काहींच्या घरी पार्टी केल्याची माहिती दिली, असा संशय आल्याने 4 ते 5 जणांनी मिळून गावात दादा ठाकूर यास मारहाण केली. मारहाणीत त्याच्या डोक्यात लाकडी दांडके टाकल्याने तो जबर जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तिसरी मुलगीच झाली, बायकोला जिवंत पेटवलं, नवऱ्याच सैतानी कृत्य
तिसरी मुलगी झाल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला पेटवल्याची घटना परभणीत घडली आहे. या घटनेनंतर महिलेने जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली होती. मात्र तिचा वाचवण्यात यश आले नाही आणि तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेनंतर मयत मुलीच्या बहिणीने आपल्या भाऊजींविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आता गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात कुंडलिक काळे आणि त्याच्या पत्नी मुलींसह वास्तव्यास होते. कुंडलिक काळे यांना त्यांच्या पत्नीपासून सूरूवातीला दोन मुली होत्या. या दोन मुलींच्या पाठोपाठ त्यांच्या बायकोला पुन्हा मुलगीच झाली होती.त्यामुळे कुंडलिक काळे प्रचंड रागावले होते आणि नाराज झाले होते.
