TRENDING:

'यांना सोडू नका, कापून टाका', जळगावात मध्यरात्री रक्तरंजित राडा, तिघांवर तलवारीने वार

Last Updated:

Crime in Bhadgaon: जळगावच्या भडगाव तालुक्यातील वाक येथे कारमधून आलेल्या चार जणांनी तीन जणांवर जीवघेणा हल्ला केला केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: जळगावच्या भडगाव तालुक्यातील वाक येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं कारमधून आलेल्या चार जणांनी तीन जणांवर जीवघेणा हल्ला केला केला आहे. आरोपींनी कारमधून उतरून थेट तलवारीने मानेवर आणि मनगटावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी आरोपींनी 'यांना सोडू नका, कापून टाका' अशी चिथावणी देखील दिली. रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Ai Generated Photo
Ai Generated Photo
advertisement

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या भडगाव तालुक्यातील वाक येथील राकेश पाटील आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी इंडिका व्हिस्टा कारमधील योगेश याने त्यांना जोरदार धडक दिली. यानंतर आरोपींनी कारमधून उतरून राकेश यांच्या मानेवर आणि मनगटावर तलवारीने वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी राकेश पाटील यांचे वडील आणि काकांवरही तलवारने वार केले.

advertisement

तर उमेश याने लाकडी दांडकाने मारहाण केली. यावेळी आरोपी चिथावणी देत म्हणाले की, यांना सोडू नका, कापून टाका. या हल्ल्यात राकेश पाटील यांच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

राकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून मारेकरी योगेश, उमेश, सतीश, अक्षय, अशा चारही संशयित आरोपींविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील मारेकरी सतीश नामक तरुणाला अटक करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
'यांना सोडू नका, कापून टाका', जळगावात मध्यरात्री रक्तरंजित राडा, तिघांवर तलवारीने वार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल