TRENDING:

भारताच्या या कोपऱ्यात निकाल देणाऱ्या न्यायाधीशालाच फासावर लटकवलं होतं, कारण ऐकून तुम्ही म्हणाल योग्यच केलं!

Last Updated:

न्यायाधीश दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षाही सुनावतात; पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, की न्यायाधीशांनाच फाशी देण्यात आली आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आसाम, 20 ऑक्टोबर : न्यायाधीशांना खटल्याचा निकाल देताना आपण पाहतो, त्याविषयी ऐकतो. काही घटनांमध्ये न्यायाधीश दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षाही सुनावतात; पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, की न्यायाधीशांनाच फाशी देण्यात आली आहे? हे तालिबानबद्दल नाहीये. ही गोष्ट भारतातच घडलेली आहे. एका न्यायाधीशाला फाशी देण्यात आली होती. होय. हे 100 टक्के खरं आहे. ही घटना जवळपास 45 वर्षं जुनी आहे आणि त्यामागचं कारणदेखील खूप भयानक होतं. त्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्ही ही हळहळ व्यक्त कराल. हा प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विचारण्यात आला होता. त्यावर अनेकांनी उत्तर दिलं.

राजखोवा यांना अटक करण्यात आली. जवळपास वर्षभर खटला चालला आणि..
राजखोवा यांना अटक करण्यात आली. जवळपास वर्षभर खटला चालला आणि..
advertisement

हे ज्या न्यायाधीशांबद्दल आहे, त्यांचं नाव होतं उपेंद्रनाथ राजखोवा. ते आसामच्या दुबरी जिल्ह्यात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले होते. न्यायमूर्ती असल्याने त्यांना सरकारी निवासस्थान होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजखोवा फेब्रुवारी 1970मध्ये निवृत्त झाले. परंतु त्यांनी सरकारी बंगला रिकामा केला नाही. त्याच बंगल्यात ते पत्नी आणि तीन मुलींसह राहत होते. एके दिवशी अचानक त्याची पत्नी आणि तीन मुली गायब झाल्या. राजखोवा यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं जायचं तेव्हा ते कोणत्या ना कोणत्या बहाण्याने टाळायचे. दरम्यान, एप्रिलमध्ये त्यांनी सरकारी बंगला रिकामा केला आणि त्यांच्या जागी आलेले अन्य न्यायाधीश त्या बंगल्यात राहू लागले.

advertisement

सिलिगुडीतल्या हॉटेलमध्ये केला होता मुक्काम

नंतर राजखोवा बेपत्ता झाले. त्यांच्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं. राजखोवा यांचे मेहुणे पोलिसात असल्याने, तसंच बहीण आणि भाचीशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी राजखोवा यांचा शोध सुरू केला. बर्‍याच दिवसांनी ते सिलिगुडीतल्या हॉटेलमध्ये थांबल्याचं कळलं. त्यांनी इतर पोलिसांसह हॉटेलवर छापा टाकला आणि चौकशी केली असता, राजखोवा यांनी आधी सबब सांगितली; पण नंतर त्यांनी पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं. त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह राजखोवा यांनी शासकीय बंगल्यात गाडले होते.

advertisement

न्यायालयाकडून नाही मिळाला दिलासा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

राजखोवा यांना अटक करण्यात आली. जवळपास वर्षभर खटला चालला आणि कनिष्ठ न्यायालयाने राजखोवा यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली; मात्र हायकोर्टानेही कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले; पण तिथेही त्यांचं अपील फेटाळण्यात आले. वृत्तानुसार, राजखोवा यांनी स्वत:ला फाशीपासून वाचवण्यासाठी राष्ट्रपतींसमोर दया याचिकाही दाखल केली होती. परंतु त्यांचं अपील फेटाळण्यात आले. शेवटी, 14 फेब्रुवारी 1976 रोजी राजखोवा यांना जोरहाट तुरुंगात फाशी देण्यात आली. त्यांनी पत्नी व मुलींची हत्या का केली, हे अद्यापही समजू शकलेलं नाही.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
भारताच्या या कोपऱ्यात निकाल देणाऱ्या न्यायाधीशालाच फासावर लटकवलं होतं, कारण ऐकून तुम्ही म्हणाल योग्यच केलं!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल