20 वर्षीय आरोपी तरुण चिरागने एका पती, पत्नीसह त्यांच्या मुलावर कैचीने हल्ला केला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. मृत व्यक्तीचे नाव चमनलाल आहे. तर त्यांचा मुलगा कार्तिक गंभीर जखमी झालेला आहे. चिराग सोनी असे या हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
advertisement
केळीच्या पानांच्या बंडलवरून वाद...
मिळालेल्या माहितीनुसार, चमनलाल कार आणि चिराग सोनी यांचे एपीएमसी मार्केटमध्ये केळीच्या पानांची विक्री करण्याचे व्यवसाय होते. आज विक्रीसाठी आलेल्या केळीच्या पानांच्या बंडलमध्ये अदलाबदली झाली. ज्यामुळे चमनलाल आणि चिराग यांच्यात वाद झाला. याच वादातून चिरागने कैचीने हल्ला केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
