TRENDING:

दिवसभर फक्त चॅटिंग करून कमवले 30 कोटी; कमाईची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

Last Updated:

दोन तरुण ज्यापैकी एक बँकेत काम करत होता, तर दुसरा बँकेत नुसता चकरा मारत होता. इतकंच काम करून दोघंही ऐशोरामात आयुष्य जगत होते. त्यांची कमाईची पद्धत पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कामिर कुरैशी, प्रतिनिधी/ आग्रा: मोबाईलच्या जमान्यात अनेकांना एकमेकांशी फेस टू फेस बोलण्यात वेळ नाही. बहुतेक लोक चॅटिंगवरच एकमेकांशी बोलतात. असेच दोन तरुण जे दिवसभर चॅटिंग करायचे. चॅटिंग करूनच त्यांनी ते करोडपती बनले. तब्बल 30 कोटी रुपये त्यांनी कमावले आहे. पोलिसांना जेव्हा या तरुणांच्या पैसे कमवण्याच्या पद्धतीबाबत माहिती झाली. तेव्हा त्यांच्या कमाईचा मार्ग पाहून पोलीसही चक्रावले.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील हे दोन तरुण. एक बँकेत काम करत होता, तर दुसरा बँकेत नुसता चकरा मारत होता. इतकंच काम करून दोघंही ऐशोरामात आयुष्य जगत होते. या दोघांनी 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या खात्यात 6 कोटी रुपये सापडले. हे तरुण सोशल साइट्सवर जास्त असायचे. टेलिग्रामवर लोकांचे ग्रुप तयार करायचे आणि त्यांच्याशी चॅटिंग करत राहायचे.  त्यांचा पगारही तितका नव्हता मग त्यांच्याकडे इतके पैस आले कसे, असा प्रश्न पोलिसांनीही पडला.

advertisement

सोसायटीमध्ये गाडी लावताय, सावधान! आधी एकदा तरी हा VIDEO पाहा

या तरुणांवर पाळत ठेवणाऱ्या विंग कमांडरने 23 फेब्रुवारीला आग्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरणाच्या तपासासाठी आग्रा पोलीस या तरुणांपर्यंत पोहोचले. डीसीपी सूरज राय म्हणाले, '23 फेब्रुवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये फिर्यादीने सांगितलं की टेलिग्रामच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 1.99 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. एसीपी हरी पर्वत यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. तपासानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

advertisement

नेमंक काय करायचे तरुण?

पोलिसांना तरुणाच्या पैसे कमावण्याच्या अनोख्या पद्धतीबद्दल माहिती मिळवली तेव्हा तेसुद्धा आश्चर्यचकित झाले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितलं की, हे लोक सोशल साइट्सवरून लिंक पाठवून लोकांना फसवत असत. हे तरुण मोठे नेटवर्क तयार करून लोकांना फसवायचे आणि नंतर सायबर फसवणूक करून फसवणूक करायचे.

आरोपी हे ॲप देशाबाहेरील सर्व्हरवर होस्ट करायचे आणि त्याद्वारे वेगवेगळ्या सोशल मीडियावर लिंक द्यायचे. त्यानंतर त्या लिंक्सद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. मग ते पैसे म्युल अकाऊंटमध्ये सर्क्युलेट करायचे. याच म्युल अकाऊंटच्या माध्यमातून पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. एक बँक कर्मचारी असून दुसरा आरोपी बँकेत खाती उघडायचा.

advertisement

आरोपींनी कमवले 3 कोटी

पोलीस तपासात तब्बल 42 बँक खाती उघडकीस आली असून त्यात फसवणूक करून पैसे गोळा केले गेले. पोलिसांनी गोठवलेल्या या 42 खात्यांमध्ये 6 कोटींहून अधिक रक्कम पोलिसांना सापडली आहे. त्यांनी आतापर्यंत 25 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. त्यांनी पीडित विंग कमांडर आणि इतरांची 1.99 कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

advertisement

Crime News : अब्दुलची किडनी विकून टाकू; वडिलांना आला फोन, अमेरिकेत नेमकं काय झालं?

डीसीपी राय पुढे म्हणाले, 'आरोपी बाहेरील लोकांशी बोलून काम करून घेत असत. आतापर्यंत 6 कोटी रुपयांची 42 खाती आमच्या निदर्शनास आली आहेत, ती गोठवण्यात आली आहेत. 42 खात्यांमधून अंदाजे 25 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. आरोपींकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या टोळीत आणखी काही लोक आहेत, त्यांचीही ओळख पटली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

पोलीस या टोळीतील अन्य गुन्हेगारांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. त्याचवेळी डीसीपी सिटी सूरज राय यांनी हा खुलासा करणाऱ्या टीमला 25 हजार रुपयांचे रोख बक्षीसही दिलं आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
दिवसभर फक्त चॅटिंग करून कमवले 30 कोटी; कमाईची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल