सोसायटीमध्ये गाडी लावताय, सावधान! आधी एकदा तरी हा VIDEO पाहा

Last Updated:

सोसायटीमध्ये पार्क केलेली स्कूटी रातोरात गायब झाली. सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दृश्य पाहून मालकाला धक्काच बसला.

सोसायटीत पार्क केली स्कूटी अन्...
सोसायटीत पार्क केली स्कूटी अन्...
पालघर :  रस्त्यावर कुठेही गाडी पार्क करताना आपल्याला थोडं टेन्शन असतं. पार्किंगमध्ये गाडी लावली की आपण बिनधास्त असतो. तर जेव्हा गाडी आपण आपल्या सोसायटीच्या आवारात असतो तेव्हाही आपल्याला गाडीची चिंता नसते. म्हणजे आली गाडी पूर्णपणे सुरक्षित आहे, असंच आपल्याला वाटतं. तुम्हीही सोसायटीमध्ये अशीच बिनधास्तपणे गाडी लावत असाल तर सावधान! व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा.
पालघरच्या नायगावमधील अमोल नगर परिसरातील ही घटना. इथल्या कमल सागर सोसायटीत पार्क केलेली ही स्कूटी. ही स्कूटी रातोरात गायब झाली आहे. 22  मार्च रोजी मध्यरात्री 2.37 वाजताची ही घटना आहे. आता ते कसं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्य पाहून सर्वांना धक्काच बसला.
advertisement
यानंतर स्कुटी मालकाने पोलिसात धाव घेतली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती सोसायटीच्या आवारातून स्कूटर ढलकून सोसायटीबाहेर नेताना दिसत आहे. याचा अर्थ स्कूटी चोरीला गेली आहे. याप्रकरणी स्कूटर मालकाने पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली आहे.  पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
advertisement
चोरट्यांपासून गाडी सुरक्षित ठेवणारं ग्रिप लॉक
ग्रिप लॉक कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही, तर एक साधारण दिसणारं लॉक आहे. जे चावीने उघडतं आणि बंद होतं. पण याची विशेष बाब म्हणजे हे सहजपणे तोडलं जाऊ शकत नाही, उघडलं जाऊ शकत नाही आणि कापलंही जात नाही. हे लॉक स्टेनलेस स्टील-अलॉय मेटल आणि फायबरने तयार झालेलं असल्याने अतिशय मजबूत आहे. याचा आकारही छोटा असल्याने, सहजपणे कुठेही घेऊन जाता येऊ शकतं.
advertisement
ग्रिप लॉक कसं वापरायचं?
याला दोन कम्पार्टमेंट देण्यात आले आहेत. एकात हँडलबारचं ग्रिप आणि दुसरं ब्रेक लिवरचं. चावीच्या मदतीने उघडून यात असलेल्या कम्पार्टमेंटदरम्यान ग्रिप आणि ब्रेक ठेवा फोल्ड करुन, अनलॉक करा. हे उघडण्यासाठी केवळ 10 सेकंदाचा वेळ लागतो. लॉक झाल्यानंतर हे फ्रंट ब्रेकला दाबून ठेवतं. जर कोणी गाडी चोरण्याचा प्रयत्न केला, तर पुढचा ब्रेक दाबला असल्याने गाडी पुढे घेऊन जाता येणार नाही आणि एक्सिलेटरही वापरता येणार नाही.
advertisement
ग्रिप लॉकची किंमत
ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर ग्रिप लॉक मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ब्रँडनुसार याच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. अमेझॉनवर सर्वात स्वस्त ग्रिप लॉक 779 रुपयांचं आहे. तर 9500 रुपयांचं हँडलबार ग्रिप लॉकही उपलब्ध आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
सोसायटीमध्ये गाडी लावताय, सावधान! आधी एकदा तरी हा VIDEO पाहा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement