रस्त्यावर लावली आग; मग त्यातच नाचू लागली तरुणी, शेवटी जे केलं ते धक्कादायक, Shocking Video
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
काही वेळ वर्तुळात नाचल्यानंतर ती तरुणी बाहेर आली आणि मग तिने एक आश्चर्यकारक कृत्य केलं. तिने जळणारी लाकडे तोंडात घातली आणि मग आग विझवली.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा यासाठी काहीतरी विचित्र करून ते स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. तर, काहीवेळा स्वतःसोबतच दुसऱ्यांचाही जीव धोक्यात घालतात. आपले मस्तीसाठी ते असं काहीतरी करतात, जे इतरांसाठी त्रासदायक ठरतं. अशाच एका तरुणीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी रस्त्यावर खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. ती रस्त्यावर आग लावते आणि त्याच्या मध्ये जाऊन डान्स करू लागते.
आपल्या या कृत्यामुळे इतरांना काय त्रास होत असेल का? याचा ती विचारही करत नाही. अलीकडेच एका मुलीचा व्हिडिओ @2eduong नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे, जो व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हिएतनामचा आहे. हा व्हिडीओ एका गर्दीच्या रस्त्यावरील आहे, जिथून खूप गाड्या जात आहे आणि जवळपास अनेक दुकानंही आहेत. अचानक एक मुलगी रस्त्याच्या मधोमध येते आणि त्या रस्त्यावर कोणत्यातरी ज्वलनशील पदार्थाने एक वर्तुळ बनवते. तिच्या हातात दोन जळत्या काठ्या आहेत ज्याच्या मदतीने ती वर्तुळ पेटवते.
advertisement
advertisement
मग ती वर्तुळात नाचू लागते. हे पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित होतात. स्कूटर चालवणाऱ्या लोकांसाठी हे खूप धोकादायक असू शकतं कारण गाडी आगीच्या इतक्या जवळून गेली तर गाडीलाही आग लागू शकते. मात्र, असं काहीही झालं नाही आणि लोक तिथून हळूहळू निघून गेले. काही वेळ वर्तुळात नाचल्यानंतर ती तरुणी बाहेर आली आणि मग तिने एक आश्चर्यकारक कृत्य केलं. तिने जळणारी लाकडे तोंडात घातली आणि मग आग विझवली.
advertisement
या व्हिडिओला 21 लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितलं, की लोकांना अजिबात लाज नाही. एकजण म्हणाला, ती महिला मूर्ख आहे का, ती असं कृत्य का करत आहे? या महिलेला ताबडतोब तुरुंगात टाकलं जाईल, असा दावा एकाने केला. इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 23, 2024 2:13 PM IST
मराठी बातम्या/Viral/
रस्त्यावर लावली आग; मग त्यातच नाचू लागली तरुणी, शेवटी जे केलं ते धक्कादायक, Shocking Video