Crime News : अब्दुलची किडनी विकून टाकू; वडिलांना आला फोन, अमेरिकेत नेमकं काय झालं?

Last Updated:

अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडलाय. सध्या अमेरिकेत राहत असणारा हा विद्यार्थी 7 मार्च 2024 पासून गायब झालाय.

अब्दुलची किडनी विकून टाकू; वडिलांना आला फोन, अमेरिकेत नेमकं काय झालं?
अब्दुलची किडनी विकून टाकू; वडिलांना आला फोन, अमेरिकेत नेमकं काय झालं?
मुंबई : अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडलाय. सध्या अमेरिकेत राहत असणारा हा विद्यार्थी 7 मार्च 2024 पासून गायब झालाय. त्याचा हैदराबादमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयाशी संपर्क झालेला नाही. त्यातच संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना खंडणीसाठी फोन आल्याने खळबळ उडाली आहे. हैदराबादच्या नाचराम परिसरात राहणारा मोहम्मद अब्दुल (वय 25) हा मे 2023 मध्ये क्लीव्हलँड विद्यापीठातून आयटीमध्ये मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. तेव्हापासून अब्दुल क्लीव्हलँडमध्ये राहत होता; मात्र 7 मार्च 2024 नंतर त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला नाही.
याबाबत अब्दुलचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितलं, की ‘माझं मुलाशी शेवटचं बोलणं 7 मार्चला झालं होतं. त्यानंतर तो आमच्या कुटुंबातल्या कोणाच्याही संपर्कात नाही. त्याचा मोबाइल फोनही बंद आहे. अब्दुलच्या अमेरिकेतल्या रूममेट्सशी मी संपर्क साधला होता. त्या वेळी कळलं, की अब्दुल हरवल्याची तक्रार क्लीव्हलँड पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. त्यातच 19 मार्च 2024 ला आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्या व्यक्तीने दावा केला, की ड्रग्ज विकणाऱ्या टोळीनं अब्दुलचं अपहरण केलं असून त्याच्या सुटकेसाठी 1200 अमेरिकन डॉलर्स द्या.’
advertisement
‘खंडणी न दिल्यास अब्दुलची किडनी विकण्याची धमकीही फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली,’ असं सांगतानाच अब्दुलचे वडील सलीम पुढे म्हणाले, ‘मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने सांगितलं, की अब्दुलचं अपहरण करण्यात आलं असून, त्याच्या सुटकेसाठी पैसे द्या. परंतु पैसे कसे पाठवायचे, याबाबत त्या व्यक्तीनं काहीही माहिती दिली नाही. जेव्हा त्या व्यक्तीला मी माझ्या मुलाशी बोलणं करून द्या, असं सांगितलं, तेव्हा संबंधित व्यक्तीने त्यास नकार देऊन फोन ठेवून दिला.’
advertisement
आता अब्दुलच्या पालकांनी त्यांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी आणि त्याला सुखरूप भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारला आवश्यक पावलं उचलण्याची विनंती केली आहे. या संदर्भात सलीम यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना पत्रही लिहिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : अब्दुलची किडनी विकून टाकू; वडिलांना आला फोन, अमेरिकेत नेमकं काय झालं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement