आरोपी अविनाश बोरकर याने सांगितलं की, गंगाधर आणि तो मित्र असून गंगाधर हा नेहमी अविनाशच्या पत्नीची बदनामी करीत होता. त्याचा राग अगोदरपासून डोक्यात होता. अशातच घटनेच्या दिवशी ते तिघे दारू पित असताना गंगाधरने परत अविनाशच्या पत्नीची बदनामी केली. यामुळे राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या अविनाशने जीवे मारण्याच्या उद्देशातून गंगाधरवर हल्ला केला.
advertisement
छ. संभाजीनगरात जागते रहो! नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाणं केलं बंद; शाळांनाही सुट्टी, नेमकं काय घडलं?
गंगाधर विजय चांद्रिकापुरे याच्या पोटावर, छातीवर आणि शरीरावर वार करून त्याला गंभीररित्या जखमी करण्यात आलं. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, परिसरातील नागरिकांची विचारपूस आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या पोलिसांनी प्रशांत वाघमारे याला डोंगरगड येथून तर अविनाश बोरकर याला रामटेक येथून पकडून जेरबंद केलं आहे. तर दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.