मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या चिनहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराबंकी येथे राहणारा सुशील यादव आणि त्याचा मामेभाऊ सुभाष यादव हे समर्पण हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करतात. पगार मिळाल्यानंतर दोघेही त्यांचा मित्र सुशील चौरसियासोबत दारू पार्टी करत होते. यावेळी सुशील आणि सुभाष यांच्यात पेग बनवण्यावरून वाद सुरू झाला.
advertisement
रागाच्या भरात सुभाषने काठी उचलून सुशीलच्या डोक्यात अनेक वार केले. यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. यानंतर सुभाषने त्याला जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं आणि तिथून पळ काढला. यानंतर त्याच्या एका मित्राने जखमीला रुग्णालयात दाखल केलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. एडीसीपी अली अब्बास यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील यादव, सुशील चौरसिया आणि सुभाष यादव यांच्यासह तीन जण दारू पार्टी करत होते. यावेळी दारुवरून वाद झाला आणि याचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. मामेभावाने अनेक वार करून तरुणाची हत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
