TRENDING:

Dating App Scam : 'बुलाती है मगर जाने का नही' तिनं तरुणाला भेटायला बोलावलं आणि... कांड होताच पोलिसात धाव

Last Updated:

मुंबईत असंच एक मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे, यात काही मुली डेटिंग अॅपवरून तरुणांना फसवून रेस्टॉरंटमध्ये बोलावायच्या आणि तिथे खोटे, प्रचंड बिल लावून पैसे उकळायच्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल अनेक तरुण-तरुणी मैत्री आणि रिलेशनशिपसाठी डेटिंग ऍपचा वापर करतात. पण या डिजिटल जगात कुठलीही ओळख पक्की करण्याआधी सावध राहणं गरजेचं आहे. कारण अशा प्लॅटफॉर्मवर काही लोक विश्वास संपादन करून मोठ्या फसवणुकीचा डाव आखतात. याबाबत अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे लोकांना सतर्क रहाण्याची गरज आहे. पण असं असलं तरी देखील काही काही लोक भावनेच्या भरात अशा लोकांना भुलतात आणि आपलं नुकसान करुन बसतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

मुंबईत असंच एक मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे, यात काही मुली डेटिंग ऍपवरून तरुणांना फसवून रेस्टॉरंटमध्ये बोलावायच्या आणि तिथे खोटे, प्रचंड बिल लावून पैसे उकळायचे.

कसा रचला जायचा हा डाव?

ही फसवणूक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली जात होती. मुली आधी डेटिंग अॅपवरून ओळख वाढवायच्या, हळूहळू विश्वास जिंकायच्या आणि मग भेटीचं आमंत्रण द्यायच्या. ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तो मुलगा पोहोचायचा, तेव्हा आधीच सर्व काही सेट असायचं. स्टाफ, वेटर आणि अगदी मेन्यूपर्यंत. महागड्या गोष्टी ऑर्डर करायला लावून नंतर अचानक मोठ्ठं बिल तरुणाच्या हातात दिलं जायचं.

advertisement

एका तरुणाच्या चातुर्याने उघडकीस आलं प्रकरण

मुंबईतील बोरीवली परिसरात असाच प्रकार एका 22 वर्षीय तरुणाबरोबर घडला. 11 एप्रिलला त्याची दिशा नावाच्या मुलीसोबत डेटिंग अॅपवर ओळख झाली. दुसऱ्याच दिवशी दोघांनी भेटायचं ठरवलं आणि रेस्टॉरंटमध्ये भेट झाली. तिथे हुक्का, मद्यपान आणि एनर्जी ड्रिंक्स ऑर्डर करण्यात आल्या. थोड्याच वेळात वेटरने थेट ₹35,000 चे बिल त्याच्यासमोर आणलं.

advertisement

अचानक एवढं मोठं बिल पाहून तो तरुण घाबरला. त्याने पैसे देण्यास नकार दिला, पण हॉटेलचा स्टाफ त्याला धमकावू लागला. त्रस्त होऊन त्याने लगेच 100 नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांचं नाव घेतल्यावर स्टाफ थोडा शांत झाला आणि बिल ₹30,000 वर आणलं. दिशा नावाच्या मुलीने देखील अर्धं बिल स्वतः देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर अर्ध बिल भरुन तरुण निघाला.

advertisement

घरी जाऊन जेव्हा त्याने व्यवहार तपासला, तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. त्याने दिलेले ₹15,000 रेस्टॉरंटच्या खात्यात नसून एका वैयक्तिक यूपीआय आयडीवर पाठवलेले होते. इथूनच त्याला संशय आला आणि त्याने थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि सर्वप्रथम त्या यूपीआय आयडीचा मागोवा घेतला. त्यानंतर मुलीचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले.

advertisement

दिशाला चौकशीत ताब्यात घेतल्यावर संपूर्ण गँगचा पर्दाफाश झाला. हे रॅकेट बराच काळ अशा प्रकारे अनेकांना फसवत होतं, हेही समोर आलं.

21 आरोपी गजाआड, 6 मुलींचा समावेश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?
सर्व पहा

या प्रकरणात पोलिसांनी एकूण 21 जणांना अटक केली असून, त्यात 6 मुलींचाही समावेश आहे. हे सर्वजण मिळून तरुणांना फसवायचे, त्यांना धमकवायचे आणि पैसे उकळायचे. सध्या पोलीस या नेटवर्कची सखोल चौकशी करत आहेत, जेणेकरून आणखी पीडितांना न्याय मिळू शकेल.

मराठी बातम्या/क्राइम/
Dating App Scam : 'बुलाती है मगर जाने का नही' तिनं तरुणाला भेटायला बोलावलं आणि... कांड होताच पोलिसात धाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल