TRENDING:

Gondia News : बापाने पोटच्या लेकाची दगडाने ठेचून केली हत्या, गोंदिया हादरलं

Last Updated:

दारुच्या आहारी गेलेल्या मुलाची वडिलांनीच दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मुल्ला येथे बापाने पोटच्याच मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतक हंसराज नारायण मुनेश्वर (३२) याने आपल्या पत्नीला तिच्या माहेरगावी सालई येथे पाठविले. हंसराजला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिऊन घरी मुल्ला येथे पोहोचला. घरी पोहोचताच त्याने आई-वडिलांबरोबर भांडण सुरू केले. भांडण एवढे विकोपाला पोहोचले की मारहाण झाली. यातच बाप-लेकाच्या हाणामारीत मुलाच्या डोक्याला दगडाने मारत असल्याने जबर मार लागून, मुलगा घराच्या अंगणातच ठार झाला.

advertisement

देवरी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली असता देवरी पोलिसांनी लगेच धाव घेत पंचनामा केला. श्वान पथकाच्या मदतीने काही तासातच आरोपीला अटक करण्यात आली. तर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले. देवरी पोलिसांनी आरोपी वडिलाला ताब्यात घेऊन कलम १०३ (१) नुसार अटक करण्यात आली. आरोपीला स्वान पथकाच्या मदतीने अवघ्या काही तासातच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. सदर घटनेचा तपास देवरी पोलीस करत आहेत.

advertisement

Chhatrapati Sambhajinagar : तरुणाने ब्लॅकमेल केलं, 17 वर्षीय मुलीने आयुष्यच संपवलं; छ. संभाजीनगर हादरलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

तरुणाच्या जाचाला कंटाळून १७ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय. जटवाडा रोडवर असलेल्या ओव्हार गावात तरुणी राहत होती. तिला कासिम यासीन पठाण नावाचा तरुण सतत त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उछललं आहे. या प्रकरणी तरुणाला अटक करावी अशी मागणी तरुणीच्या कुटुंबियांनी केलीय.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Gondia News : बापाने पोटच्या लेकाची दगडाने ठेचून केली हत्या, गोंदिया हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल