सोशल मीडियाचा अतिरेक, मोबाईलचा वाढता वापर किंवा यातून निर्माण होणारं नात्यांमधलं संशयाचं भूत अलीकडे माणसाला एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत माणुसकी विसरून वागायला भाग पाडतंय. मोबाईलच्या वापराचा अतिरेक नात्यांमध्ये नुसतेच तणाव निर्माण करत नाही तर त्यातून हत्या करण्यापर्यंतचे गुन्हे घडण्यासही लोक मागेपुढे बघत नाहीत, हे वास्तव बाप-लेकीच्या घटनेतून दिसत आहे. छत्तीसगडमध्ये एका पित्यानं आपल्या पोटच्या मुलीची बेदम मारून हत्या केली आहे. छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात तमनार पोलिस ठाण्याच्या हद्दीत धौराभांठा इथं गुरुवारी संध्याकाळी साधारण साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. श्यामकुमार राठिया असं या पित्याचं नाव असून बाहरतीन राठिया (21) असं त्याच्या मुलीचं नाव आहे. ठाण्याचे प्रभारी आशीर्वाद राहटगावकर यांनी ही माहिती दिली आहे.
advertisement
लेकीची हत्या नेमकी केली का?
श्यामकुमार राठिया हा ट्रक चालक आहे. त्यामुळे तो सतत घरापासून दूर असतो. 15 दिवसांपूर्वी तो घरी आला होता. गुरुवारी संध्याकाळी काही कामानिमित्तं त्यानं आपली मुलगी बाहरतीन हिला हाक मारली. तिला ऐकू न गेल्यामुळं त्यानं वारंवार हाक मारली, तरीही तिनं हाकेला ओ न दिल्यामुळं श्यामकुमार याला राग आला. त्यामुळं रागावलेल्या श्यामकुमारने खाटेच्या पायानंच मुलीला बेदम मारहाण केली आणि त्यातच तिनं जीव गमावला. पोलिसांनी पिता श्याम कुमार याला अटक केली.
वाचा - एका हातात बायकोचं डोकं घेऊन गाठलं पोलिस स्टेशन, एका संशयावरुन नवऱ्याचं धक्कादायक पाऊल
पोलिसांनी आरोपीला केली अटक
या घटनेत मरण पावलेल्या मुलीच्या काकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी श्याम कुमार राठिया याला कलम 302 अंतर्गत अटक केली असून पुढची कारवाई सुरू आहे.
कुटुंबातला विसंवाद
श्याम कुमार हा ट्रक चालक असल्यामुळे तो अनेक दिवस कुटुंबापासून दूर रहात होता. गेल्या काही दिवसांपूर्वी तो घरी परतला होता. कदाचित हा काळ त्याला कुटुंबाबरोबर घालवायचा होता. मात्र, मोबाईलच्या वेडात तरूण पिढी गुरफटून गेल्यामुळे संवाद साधण्यासाठीसुद्धा घरातले सदस्य एकमेकांसमोर नसतात. यातूनच निर्माण झालेल्या रागामुळं श्याम कुमार यानं हे टोकाचं पाऊल उचललं असेल का, अशी चर्चा आहे.
