डॉ. मिलिंद भोर यांनी सांगितले की, महाराष्ट्र कारागृह प्रशासन आणि आदर्श मित्र मंडळ कैद्यांच्या सुधारासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. याच उपक्रमांतर्गत हे चित्रकलेचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात मुक्त बांधव म्हणजे शिक्षा पूर्ण करून चांगल्या वर्तनामुळे लवकर मुक्त झालेल्या कैद्यांनी कारागृहात असताना काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य प्रदर्शन खुले ठेवण्यात आले आहे.
advertisement
या प्रदर्शनात दोन मुक्त बांधवांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी एकाने आकर्षक चित्र रेखाटले असून दुसऱ्याने त्या चित्रास संदर्भित माहिती लिहिली आहे. शिक्षा भोगून समाजात परतलेल्या या बांधवांना नवे आयुष्य उभारण्यासाठी अशा उपक्रमांमुळे मोठा आधार मिळतो. त्यामुळे पुणेकरांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





