Pune News:आता पुणेकर घेणार ‘ओपन गॅलरी बस’चा आनंद; कधी सुरू होणार ही सुविधा?

Last Updated:

पुण्यात लवकरच लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या धर्तीवर ‘ओपन गॅलरी बस’ सेवा सुरू होणार आहे.

पीएमपीएमएलची ओपन गॅलरी बससेवा
पीएमपीएमएलची ओपन गॅलरी बससेवा
पुणे : पुण्यात लवकरच लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या धर्तीवर ‘ओपन गॅलरी बस’ सेवा सुरू होणार आहे. या नव्या उपक्रमामुळे पुण्यातील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पीएमपीच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी ही संकल्पना पुढे आणली असून, या नव्या ओपन गॅलरी बसला ‘मेक इन पीएमपीएमएल’ असे नाव देण्यात आले आहे.
या बसमधून प्रवाशांना पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, जुन्या शैलीतील इमारती, सांस्कृतिक केंद्रे आणि शहराचे बदलते रूप जवळून पाहता येणार आहे. अनेक परदेशी शहरांत अशा बस पर्यटनाचा अनुभव दिला जातो. न्यूयॉर्क, लंडन यांसारख्या ठिकाणी या प्रकारच्या बस पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्याच धर्तीवर पीएमपीएमएलनेही पुण्यात अशी सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
advertisement
तारा आणि झाडांची व्यवस्था कशी सुधारणार?
शहरात फिरताना काही रस्त्यांवर विद्युत तारा अगदी खाली आल्याचे दिसतात, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या बसच्या मार्गातच येतात. त्यामुळे ओपन गॅलरी बस चालवताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. यासाठी सेवा सुरू करण्यापूर्वी नियोजित मार्गाची पाहणी करून, आड येणाऱ्या फांद्या आणि तारा महापालिका व महावितरणच्या मदतीने हटवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
advertisement
पीएमपीएमएल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितलं, की पीएमपीला दरवर्षी मोठी संचलन तूट येत असते. ही तूट कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहोत. त्याचाच भाग म्हणून आम्ही परदेशातील शहरांमध्ये असलेल्या ओपन गॅलरी बसप्रमाणेच एक खास बस तयार करत आहोत. तिच्या छतावर प्रवाशांना बसून शहराचे सौंदर्य पाहता येईल आणि पुणे शहर दर्शनाचा आनंद घेता येईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News:आता पुणेकर घेणार ‘ओपन गॅलरी बस’चा आनंद; कधी सुरू होणार ही सुविधा?
Next Article
advertisement
Dharashiv News : 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिवचं वातावरण तापलं
'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव
  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

View All
advertisement