Nashik News : आठ तोळ सोन हिसकावलं आणि आता पत्र पाठवून तलाक तलाक म्हटलं; पतीविरोद्धात गुन्हा दाखल

Last Updated:

Nashik Triple Talaq : नाशिकमध्ये एका तरुणीला पतीकडून कुरिअरद्वारे तिहेरी तलाक दिल्याचा दावा करणारे पत्र प्राप्त झाले. पत्र पाहून तिने महिला पोलीस कक्षात तक्रार केली. पोलिसांनी पतीसह सासरे-सासूविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

News18
News18
नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे बिहारमध्ये वास्तव्यास असलेल्या एका तरुणासोबत निकाह केलेल्या तरुणीला तिच्या पतीने पत्राद्वारे तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केला. घडलेली ही घटना शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पीडित महिलेला पत्र मिळाल्यानंतर तत्काळ तिने नाशिक पोलिसांत धाव घेत त्याबाबत तक्रार नोंदविली.
पतीने पत्नीला थेट पत्राद्वारे दिला तिहेरी तलाक
पोलिसांच्या माहितीनुसार पत्र कुरिअरद्वारे पाठवण्यात आले असून त्यामध्ये पतीने स्वतःच्या हस्ताक्षरात तिहेरी तलाक दिल्याचा दावा केला होता. ज्यात “मैं पूरे होशो हवास के साथ तुम्हें तलाक देता हूँ” असे लिहून पाठविले शिवाय ज्या वेळेस हे पत्र तिला मिळाले तेव्हा तिच्या पतीने कॉल करुन तीन वेळा तलाक म्हटलं आहे. या प्रकरणी संशयित पतीसोबतच सासरे आणि सासू यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
advertisement
नेमंक कारण काय?
पीडितेचा आरोपी पतीसोहत जानेवारी 2022 मध्ये निकाह झाला होता आणि सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरु होते. नंतर व्यवसायासाठी पैसे हवे असल्याने पतीने सासरच्यांकडून पैसे मागितले. त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि पतीने पीडितेला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. त्याने पीडितेचे आठ तोळे सोन्याची दागिने ताब्यात घेतले, त्यामुळे त्रस्त होऊन पीडितेने नाशिकमध्ये माहेरी राहण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी त्याने कुरिअरद्वारे पीडितेला एक पत्र पाठवले, ज्यामध्ये तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद आहे.
advertisement
या घटनेमुळे समाजात महिलांच्या विवाहिक हक्कांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. तिहेरी तलाक ही पद्धत कायदेशीरदृष्ट्या बंद असून कोणत्याही माध्यमातून ती अमलात आणणे गुन्हा ठरते. नाशिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिला सुरक्षिततेसाठी आणि कायदेशीर संरक्षणासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News : आठ तोळ सोन हिसकावलं आणि आता पत्र पाठवून तलाक तलाक म्हटलं; पतीविरोद्धात गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Dharashiv News : 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिवचं वातावरण तापलं
'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव
  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

  • 'तू तर दत्तक दिलेला पाटील', ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर बोचरा वार, धाराशिव

View All
advertisement