Mumbai Local Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ३५ मिनिटे उशिराने

Last Updated:
मुंबईमध्ये मध्य रेल्वेची लोकल वाहतूक दाट धुके आणि बदलापूर-कर्जत मार्गावरील कामांमुळे ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत आहे, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
1/6
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी आणि आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळपासून ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि ऑफिसला पोहोचण्याची घाई असलेले नोकरदार, अशा सर्वांचीच स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये चांगलीच तारांबळ उडाली आहे.

advertisement
2/6
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्यामागे एकाच वेळी दोन प्रमुख कारणे समोर आली आहेत. बदलापूरहून येणाऱ्या मार्गावर आज सकाळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली होती. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

3/6
बदलापूर-कर्जत मार्गावरील काम: यासोबतच, बदलापूर-कर्जत मार्गावर सुरू असलेल्या काही कामांमुळेही वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या दोन्ही कारणांमुळे लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. या बिघाडाचा फटका केवळ स्लो लोकललाच नाही, तर फास्ट लोकललाही बसला आहे.

4/6
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अनेक फास्ट लोकल ठाण्यापर्यंतच धावत आहेत, ज्यामुळे पुढील प्रवासासाठी प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक गाड्या अतिशय धीम्या गतीने धावत असल्याने, प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहोचायला मोठा विलंब होणार आहे.
[caption id="attachment_1544457" align="alignnone" width="750"] छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अनेक फास्ट लोकल ठाण्यापर्यंतच धावत आहेत, ज्यामुळे पुढील प्रवासासाठी प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक गाड्या अतिशय धीम्या गतीने धावत असल्याने, प्रवाशांना कामाच्या ठिकाणी पोहोचायला मोठा विलंब होणार आहे.</dd> <dd>[/caption]
advertisement
5/6
लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक देखील खोळंबले असून, त्यामुळे अन्य शहरातून मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली आहे.

6/6
मध्य रेल्वेनं मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मेगाब्लॉकनंतरही पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकल वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा नाहीतर ऑफिसला लेटमार्क लागेल.

Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement