LPG Cylinder Price: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्वस्त झाला LPG गॅस सिलिंडर, किती रुपयांना मिळणार झटपट चेक करा दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
१ डिसेंबरपासून दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 10 रुपयांची कपात, मात्र घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी नागरिकांना १५४२ रुपये मोजावे लागत होते ते आता या महिन्यापासून १५३१.५० रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर १७५० रुपयांवरून १७३९.५० रुपयांना उपलब्ध होईल. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी, घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
advertisement
advertisement
एलपीजी सिलिंडरची किंमत ठरवण्यामागे एक निश्चित प्रक्रिया असते. यात आयात समानता किंमत विचारात घेतली जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर, डॉलर-रुपया विनिमय दर, वाहतूक खर्च आणि कर यांसारख्या घटकांचा समावेश असतो. प्रत्येक राज्यात स्थानिक कर आणि लॉजिस्टिक्स खर्चांमुळे किमतींमध्ये फरक आढळतो. याशिवाय, सरकारकडून दिली जाणारी सबसिडी (उदा. उज्ज्वला योजना) थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे पात्र ग्राहकांचा खर्च कमी होतो.


