एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडाली. चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली.
advertisement
खाकी वर्दीला लावला डाग...
सचिन भालेराव असं अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा नाव आहे. आत्महत्या केलेल्या गुरुनाथचा मुलगा व ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार नवीन चिचकर यांचे पूर्ण सिंडिकेट हाच सचिन भालेराव सांभाळत असल्याची सूत्राकडून माहिती मिळतं आहे.
प्राथमिक तपासात खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन भालेराव याचा सतत गुरुनाथ चिचकर यांच्याशी संपर्क असल्याचे समोर आले. तपासाचा अंदाज लागताच भालेराव आपल्या मूळ गावी पळून गेला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गावातून अटक केली आहे. भालेराव सोबत अजून अन्य 3 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे .
सूत्रांच्या माहितीनुसार , नेरुळ सेक्टर-15 मधील कारवाईत अंमली पदार्थ विभागाने चार जणांना लाखो रुपयांच्या ड्रग्जसह अटक केली आहे. तर 4 जण फरार आहेत. या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार गुरुनाथ चिचकर यांचा मुलगा नवीन चिचकर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी नेरुळचे रहिवासी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चिचकर याच्या ड्रग्ज पुरवठ्याचं काम पोलीस कर्मचारी सचिन भालेराव सांभाळत होता. सचिन भालेराव पोलीस नाईक असून ते सध्या खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मात्र ड्रग्ज सिंडिकेट मध्ये भालेराव याचा मोठा सहभाग असल्याची बोलले जात आहे.
अधिकाऱ्यांशी संबंध...
सचिन भालेरावचे अंमली पदार्थ विभागातील काही अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरुनाथ चिचकर यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला होता. या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद केल आहे.
सध्या एसआयटीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आणखी काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या रॅकेटमध्ये सहभागी आहेत का ?असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी अटकसत्र राबवले जाण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या काळात नवी मुम्बईतील मोठा मोठा ड्रग्ज सिंडिकेट उद्वस्त करण्यात आलं आहे.
