नेमकं घडलं काय?
गेल्या काही काळापासून वैभव पाटील आणि त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. या वादातूनच दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय झाला होता. मात्र, वैभव यांची बुलेट पत्नीने नेल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. या वादानंतर वैभव नैराश्यात होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेत जीवन संपविले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
लग्न लागलं अन् 2 तासांत पळाली नवरी, नवरोबाला 5 लाखांना चुना, नेमकं घडलं काय?
सकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी ते एकटेच होते. घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. सीबीडी पोलीस या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करत असून, पुढील चौकशीनंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल.
दरम्यान, सध्याच्या काळात कौटुंबिक कलहाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पती-पत्नीच्या वादांमुळे ताण-तणाव वाढत आहे. याचा फटका मानसिक आरोग्याला बसत असून कित्येकदा टोकाचे निर्णय देखील घेतले जात आहेत. तर काही प्रकारात जीवन संपवल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे मानसिक ताण-तणावात मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.