'मार्केटमध्ये क्रेझ पाहिजे', म्हणत तो नाचवत होता नंगी तलवार, पोलिसांनी कळलं अन् भररस्त्यात आक्रित घडलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील प्रशांत अवारे या 21 वर्षीय तरुणाने शिक्षण सोडून सोशल मीडियावर 'क्रेझ' दाखवण्याचा नाद लावला होता. महागड्या गाड्या आणि...

Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : शिक्षण सोडून महागड्या गाड्या आणि तलवारीचा नाद लागलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. प्रशांत राजेंद्र अवारे (वय-21, रा. जयभवानीनगर) असे या तरुणाचे नाव असून, त्याने एमआयटी महाविद्यालयाच्या आवारात तलवार घेऊन दहशत माजवली होती. मंगळवारी सातारा पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडील तलवार जप्त केली.
तलवार फिरवत होता हवेत
एमआयटी महाविद्यालयात प्रशांत हातात नंगी तलवार घेऊन हवेत फिरवत होता. ही गंभीर बाब साताऱ्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या लक्षात आली. त्यानंतर फौजदार गोविंद एकीलेवाले यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच प्रशांत पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला पकडले.
‘क्रेझ’च्या नादात तलवार नाचवली
प्रशांतने बी.एस.सी. मध्ये प्रवेश घेतला आहे, पण त्याला शिक्षण सोडून सोशल मीडियावर 'क्रेझ' दाखवण्याचा नाद लागला आहे. त्याचे वडील चालक असून, आई गृहिणी आहे. त्याने अजमेरहून तीन हजार रुपयांत तलवार विकत आणली होती. 'युवा मंच' नावाचे स्वतःच्या नावाची संघटना स्थापन करून तो सोशल मीडियावर तलवारीसोबतचे व्हिडिओ पोस्ट करत असे. नुकतीच त्याने चारचाकीवर बसून 'मार्केटमध्ये क्रेझ पाहिजे' असे गाणे वाजवत शहरात मिरवणूक काढली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळून त्याला ‘जमिनीवर’ आणले आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'मार्केटमध्ये क्रेझ पाहिजे', म्हणत तो नाचवत होता नंगी तलवार, पोलिसांनी कळलं अन् भररस्त्यात आक्रित घडलं!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement