TRENDING:

Operation Honeymoon: हनीमून ते हत्याकांड! 20 मे पासून 9 जूनपर्यंत नेमकं काय काय घडलं?

Last Updated:

सोनम आणि राजा रघुवंशी हनीमूनला शिलाँगला गेले, पण तिथे राजाची हत्या झाली. मेघालय पोलिसांनी 'ऑपरेशन हनीमून'द्वारे सोनम आणि इतर आरोपींना अटक केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोनम आणि राजा रघुवंशी कपल लग्नानंतर शिलाँगमध्ये हनीमूलला गेले आणि तिथून सुरू झाला खेळ, हनीमून ऐवजी हत्याकांडचा खुनी थरार समोर आला. मेघालय पोलिसांनी या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे केले आहेत. 20 मे रोजी राजा आणि सोनम हनीमूनला गेले तिथपासून ते सोनमला अटक करण्यापर्यंत म्हणजे 9 जूनपर्यंत नेमकं काय काय घडलं? 20 दिवसात कशी चक्र फिरली आणि सोनम कशी अडकली या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

मेघालय पोलिसांच्या 'ऑपरेशन हनीमून'मुळे राजा रघुवंशी हत्याकांडात अनेक धक्कादायक रहस्ये उघड झाली आहेत. एखाद्या वेबस्टोरीपेक्षा थरारक ही घटना आहे. सोनमने हनीमूनच्या नावाखाली संधी साधली आणि आपल्या प्रेमात अडसर ठरलेल्या राजाचा काटा काढला. सोनमने आपला पती राजाला काश्मीर ऐवजी हनीमूनसाठी मेघालयला जाण्यासाठी तयार केलं. हा हनीमून नसून राजासाठी मृत्यूचा सापळा होता याची कल्पना त्याला नव्हती.

advertisement

20 दिवसांमध्ये नेमकं काय घडलं?

20 मे रोजी सोनम आणि राजा हनीमूनसाठी इंदूरहून रवाना झाले. 21 मे रोजी मेघालयला पोहोचले.

21 मे रोजी राजाची हत्या करणारे तिन्ही मारेकरी विक्की, आकाश आणि आनंद, आसाममधील गुवाहाटीला पोहोचले.

21 मे रोजी आरोपींनी गुवाहाटीमध्ये त्यांच्या हॉटेलजवळून शस्त्र खरेदी केले.

22 मे रोजी तिन्ही मारेकरी सोनम आणि राजाच्या मागोमाग शिलाँगला आले.

advertisement

23 मे रोजी तिन्ही मारेकऱ्यांनी सोनमसमोरच राजाची हत्या केली.

23 मे रोजीच हत्येनंतर सर्व आरोपी गुवाहाटीला रवाना झाले.

23 मे रोजीच सोनमने इंदूरसाठी गुवाहाटीहून ट्रेन पकडली आणि 25 मे रोजी ती इंदूरला पोहोचली.

इंदूरला पोहोचल्यावर सोनमने चौथ्या आरोपी आणि मुख्य सूत्रधार राज कुशवाहाची भेट घेतली.

राजने सोनमला एका भाड्याच्या खोलीत थांबवले. तिथून एका ड्रायव्हरने सोनमला उत्तर प्रदेशातील वाराणसीमार्गे गाझीपूरला नेले.

advertisement

3-4 जून रोजी पोलिसांना सोनमचा हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाली.

5 आणि 6 जूनपर्यंत आम्ही त्यांची (आरोपींची) ओळख पटवली

7 जून रोजी मेघालय पोलिसांनी सोनम आणि इतर आरोपींना पकडले.

माफी मागा,नाहीतर सोडणार नाही; राजा रघुवंशी हत्याकांडातील नव्या ट्विस्टमुळे एकच खळबळ,कोणी दिला अल्टिमेटम?

हत्येनंतर सर्व काही अत्यंत सुनियोजित पद्धतीने घडलं. सोनमने आधी राजाच्या अकाउंटवरून पोस्ट टाकली आणि नंतर गुपचूप इंदूरला पोहोचली.हत्येनंतर सोनम 10 किलोमीटर दूर तिन्ही आरोपींसोबत सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. आरोपींच्या म्हणण्यानुसार, राजाच्या हत्येसाठी सोनमने स्वतः त्याला ठार करण्याचा इशारा दिला होता. हत्येनंतर सोनमने राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट केली होती, ज्यात तिने 'सात जन्मों का साथ' असे लिहिले होते.

advertisement

Meghalaya Crime : सोनमच्या डोक्यात शिजत होता प्लॅन, दिशाभूल करण्यासाठी एक ट्रिक वापरली अन् झाला गेम ओव्हर!

हत्येसाठी सोनमने जरी खूप नियोजन केले असले, तरी पोलिसांनी तपास सुरू केल्यावर अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले. सोनम आणि इतर मारेकरी जवळपासच्या हॉटेलमध्ये थांबले होते. तपासादरम्यान पोलिसांना 42 सीसीटीव्ही फुटेज मिळाले. सोनम आणि राजाने जिथून स्कूटी भाड्याने घेतली होती, तिथून त्यांच्या मार्गाचा 'ट्रॅक' पोलिसांना मिळाला. सोनम आणि राजाने हनीमूनचे कोणतेही फोटो किंवा पोस्ट सोशल मीडियावर टाकले नव्हते, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. हत्येनंतर रात्री 2.15 वाजता सोनमने राजाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट टाकली, ज्यामुळे पोलिसांचा संशय आणखी पक्का झाला.

राजा रघूवंशीच्या हत्येचं गुढ उलघडलं! सोनमसमोरच निर्दयीपणे झाला होता खून, आरोपींची धक्कादायक कबुली

मेघालय पोलिसांच्या मते, इतके पुरावे होते की कोणताही आरोपी वाचू शकला नसता. रक्ताने माखलेला शर्ट, रेनकोट, तुटलेली मोबाईल स्क्रीन हे सर्व पुरावे हत्याच असल्याचं स्पष्टपणे सांगत होते. आकाशचा रक्ताने माखलेला शर्ट घटनास्थळी सापडला. सोनमने तिचा रेनकोट आकाशला दिला होता, जो हत्येच्या ठिकाणापासून 6 किलोमीटर दूर सापडला. हत्येचा आरोपी आनंद पकडला गेला तेव्हा त्याने तेच कपडे घातले होते जे हत्येच्या वेळी घातले होते. राजाच्या मोबाईलची स्क्रीन हत्येच्या ठिकाणाजवळ सापडली.

मराठी बातम्या/क्राइम/
Operation Honeymoon: हनीमून ते हत्याकांड! 20 मे पासून 9 जूनपर्यंत नेमकं काय काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल