आधी मुलाची आत्महत्या, नंतर आईचा मृतदेह
सांगवी येथील काकासाहेब वेणुनाथ जाधव (वय-48) याने रेणापूर पिंपळफाटा येथे एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर काही तासांतच, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईचा, समिंद्रबाई वेणुनाथ जाधव (वय-80) यांचाही मृतदेह गावातील शेतात आढळला.
advertisement
पोलिसांनी दोघांचे मृतदेह रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. शुक्रवारी सकाळी दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, त्यानंतर सांगवी येथे माय-लेकांच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उसाच्या फडात पुरला होता मृतदेह
या घटनेची सविस्तर माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. काकासाहेबचा मुलगा म्हणाला की, "माझे वडील आजीकडे शेत विकायचे म्हणत होते, पण आजी त्याला सतत विरोध करत होती." याच रागातून वडील काकासाहेब यांनी आजी समिंद्रबाईंना जबर मारहाण केली आणि तोंड दाबून त्यांचा जीव घेतला.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी आजीचा मृतदेह स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे रेणापूर पोलीस ठाण्यात मृत काकासाहेब जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिंद्रबाईंना चार मुली आणि एक मुलगा होता. सर्वांचे लग्न झाले होते. काकासाहेबनेच आईचा खून केला आणि स्वतः आत्महत्या केली, अशी माहिती आता समोर आली आहे.
हे ही वाचा : मैत्री, नंतर जबरदस्ती संबंध, 'ती' अल्पवयीन राहिली गर्भवती, बाळाला जन्म देताच 'त्या' तरुणाचा कांड आला समोर
हे ही वाचा : 'एकनाथ शिंदेंचा पीए' असल्याचं भासवून पती-पत्नीने 18 जणांना गंडवलं; केली 55 लाखांची फसवणूक!