'एकनाथ शिंदेंचा पीए' असल्याचं भासवून पती-पत्नीने 18 जणांना गंडवलं; केली 55 लाखांची फसवणूक!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
जळगावमध्ये हितेश रमेश संघवी (वय-49) आणि त्याची पत्नी अर्पिता (वय-45) यांनी स्वतःला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील 'स्वीय सहायक' भासवून...
जळगाव : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात 'स्वीय सहायक' (Personal Assistant) असल्याचे खोटे सांगत एका पती-पत्नीने 18 जणांची तब्बल 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट आणि इतर अनेक आमिषे दाखवून ही फसवणूक नोव्हेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत करण्यात आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हा गुन्हा तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
बनावट ओळखपत्र आणि लेटर पॅडचा वापर
मूळचे पाचोरा येथील रहिवासी हितेश रमेश संघवी (वय-49) आणि त्याची पत्नी अर्पिता संघवी (वय-45, दोघे रा. नवी मुंबई) यांनी तरुण-तरुणींना नोकरी आणि वेगवेगळी कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या फसवणुकीसाठी संघवीने स्वतःला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक असल्याचे भासवले. त्यासाठी त्याने बनावट ओळखपत्र, लेटर पॅड आणि बनावट अपॉइंटमेंट लेटरही दाखवले. यामुळे तरुणांचा विश्वास संपादन करून त्याने फसवणूक केली. त्याने रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट, रेल्वे विभागात टेंडर आणि रेल्वे अधिकाऱ्यांसाठी चारचाकी वाहने भाड्याने लावण्याचे आमिष दाखवले.
advertisement
हर्षल बारी यांची 13 लाखांची फसवणूक
या फसवणुकीचा बळी ठरलेल्यांपैकी एक हर्षल शालिग्राम बारी (वय-32, रा. विठ्ठल पेठ) हे आहेत. त्यांच्या दूध डेअरीच्या व्यवसायाच्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला. हितेशने त्यांची 13 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केली. हर्षल यांच्यासह इतर उर्वरित 17 जणांकडून त्याने एकूण 42 लाख 22 हजार रुपये घेतले, असे एकूण 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
advertisement
अनेक दिवस होऊनही नोकरी किंवा काम मिळाले नाही, म्हणून फसवणूक झाल्याचे हर्षल बारी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य पाहून हा गुन्हा तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
हे ही वाचा : वृद्ध सासरा, तरुण सून, शरीराची भूक भागवण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या, शेवट धक्कादायक
advertisement
हे ही वाचा : मैत्री, नंतर जबरदस्ती संबंध, 'ती' अल्पवयीन राहिली गर्भवती, बाळाला जन्म देताच 'त्या' तरुणाचा कांड आला समोर
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 11:28 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'एकनाथ शिंदेंचा पीए' असल्याचं भासवून पती-पत्नीने 18 जणांना गंडवलं; केली 55 लाखांची फसवणूक!


