वृद्ध सासरा, तरुण सून, शरीराची भूक भागवण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या, शेवट धक्कादायक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple age gap relationship : दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघंही गुपचूप भेटत असत. जोडीदारांना सोडून सुट्टीवर जात असत. त्यांच्यात इतकं प्रेम की सासऱ्याने पत्नीला घटस्फोट दिला तर सुनेनेही तिच्या पतीला सोडलं.
नवी दिल्ली : प्रेम कधी, कुठे कसं कुणावर होईल सांगू शकत नाही. काही नाती अशी असतात जी समाजाने बनवलेल्या नियमांच्या पलीकडे असतात. कधीकधी एक महिला तिच्या स्वतःच्या सावत्र मुलापासून गर्भवती होते, तर कधीकधी आजोबा तिच्या नातीशी लग्न करतात. जेव्हा अशी नातं उघडकीस येते तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. अशीच एक धक्कादायक घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये उघडकीस आली आहे, जिथं एका वृद्ध सासऱ्या आणि तरुण सुनेमध्ये अवैध संबंध प्रस्थापित झाले. याचा शेवटही धक्कदायक झाला.
सासरा मार्क गिबन 62 वर्षांचा आणि सून जास्मिन वाइल्ड 33 वर्षांची. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघंही गुपचूप भेटत असत. जोडीदारांना सोडून सुट्टीवर जात असत. त्यांच्यात इतकं प्रेम की सासऱ्याने पत्नीला घटस्फोट दिला तर सुनेनेही तिच्या पतीला सोडलं.
जास्मिनने 2021 मध्ये गिबनचा 34 वर्षांचा मुलगा अॅलेक्सला घटस्फोट दिला होता, त्यांना दोन मुलं आहेत. गिबनने त्याच्या पत्नीलाही घटस्फोट दिला होता आणि आता तो 8 लाख पौंड किमतीच्या घरात एकटाच राहतो. अॅलेक्स आणि त्याच्या वडिलांमधील संबंधही चांगले नाहीत. अॅलेक्सला गेल्या वर्षी त्याच्या वडिलांवर कार चालवल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. वडिलांच्या या विश्वासघाताची माहिती मिळाल्यावर अॅलेक्सला खूप वाईट वाटलं.
advertisement
पण त्यांचा या नात्याचा शेवट असा की त्यांनी विचारही केला नसेल. ही घटना फ्लोरिडातील एका रिसॉर्टमध्ये घडली. जिथं दोघंही त्यांच्या मुलांसह सुट्टीसाठी गेले होते. घटनेच्या दिवशी गिबन आणि जास्मिन डिस्ने वर्ल्डजवळील सोल्टेरा रिसॉर्टमध्ये राहत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गिबनच्या इच्छेवरून पूलजवळ त्यांचा वाद सुरू झाला. गिबनने जास्मिनचं डोकं अनेक वेळा पाण्यात बुडवलं. जास्मिनने पोलिसांना सांगितलं की तिला श्वास घेता येत नव्हता आणि ती बुडेल असं वाटत होतं.
advertisement
पोलिसांनी केलेल्या सुरुवातीच्या चौकशीत दोघांनीही एकमेकांशी कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध असल्याचं नाकारलं. पण 'द सन'च्या वृत्तानुसार तपासकर्त्यांना संशय होता की हे घरगुती हिंसाचाराचं प्रकरण असू शकतं. नंतर 'डेली मेल'शी संबंधित एका कौटुंबिक सूत्राने उघड केलं की मार्क आणि जास्मिन दोघंही त्यांच्या संबंधित जोडीदारांपासून वेगळे झाल्यानंतर जवळ आले होते आणि गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना गुप्तपणे डेट करत होते. त्यांनी अनेक वेळा मुलांसोबत सुट्ट्या साजऱ्या केल्या आहेत.
advertisement
यादरम्यान गिबनने अनेक वेळा जास्मिनचं डोकं पाण्यात बुडवल्याचा आरोप आहे. जेव्हा जास्मिनने गिबनपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो तिला वारंवार पाण्यात ढकलत राहिला. या वेळी जॅस्मिनच्या 9 वर्षांच्या मुलीने तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु गिब्बनने तिलाही दूर ढकललं. जॅस्मिनने दोन महिला दूर उभ्या असलेल्या पाहिल्या आणि मदतीसाठी ओरडली, त्यांना 911 वर कॉल करण्यास सांगितलं. महिला जॅस्मिनला मदत करत असल्याचं दिसताच गिब्बन थांबला.
advertisement
कौटुंबिक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यात अलीकडेच तणाव निर्माण झाला होता, कारण जॅस्मिनला हे आवडत नव्हतं की दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये असूनही तिचं नाव गिब्बनच्या मृत्युपत्रात नव्हतं. गिब्बनने पोलिसांना कबूल केलं की त्याने जॅस्मिनला पाण्यात बुडवलं, परंतु त्याने असंही म्हटलं की त्याला तिला मारायचं नव्हतं. त्याने सांगितले की तो दारू प्यायला होता आणि वादाच्या वेळी जॅस्मिनने त्याला थप्पड मारली, त्यानंतर भांडण सुरू झालं.
advertisement
पोलिसांनी गिब्बनला हत्येचा प्रयत्न आणि दोन वेळा हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
Location :
Delhi
First Published :
August 09, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/Viral/
वृद्ध सासरा, तरुण सून, शरीराची भूक भागवण्यासाठी सगळ्या मर्यादा ओलांडल्या, शेवट धक्कादायक