Team India : 'मला बाहेर काढून त्याला घेतलं...', तडकाफडकी रिटायरमेंटनंतर टीम इंडियाच्या स्टारचा गौप्यस्फोट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडिया सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे, त्यामुळे भारतीय टीमला प्रामुख्याने टेस्ट क्रिकेटमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडिया सध्या संक्रमणाच्या काळातून जात आहे, त्यामुळे भारतीय टीमला प्रामुख्याने टेस्ट क्रिकेटमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यानंतर व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट झाली. भारताने मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तर यावर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकला, पण टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र टीम इंडियाला संघर्ष करावा लागला आहे.
2024 साली न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानातच टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियावर व्हाईट वॉश पराभवाची नामुष्की ओढावली, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला. 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही टीम इंडियाला भारतामध्येच पराभवाची धूळ चारली.
टीम इंडियात निवृत्तीचा सिलसिला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या खराब कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये निवृत्तीचा सिलसिला सुरू झाला. ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असतानाच अश्विनने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही निवृत्तीची घोषणा केली. टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर अश्विनने त्याच्या निवृत्तीवर पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला आहे.
advertisement
RAVICHANDRAN ASHWIN’S SHOCKING REVELATION ON TEST RETIREMENT ️
I think at Perth, when we had Jaddu and myself as the lead spinners in the side and Washi played that game in Perth and then the next game again I came in and then I had to again make way, was kind of suggestive… pic.twitter.com/IjuGMiorJ0
— Rohan (@rohann__45) March 17, 2026
advertisement
'ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थमधल्या पहिल्या टेस्टआधी मी आणि जडेजा टीमचे प्रमुख स्पिनर होतो, पण त्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर खेळला, त्यानंतर पुढच्या सामन्यात पुन्हा माझं टीममध्ये कमबॅक झालं, यानंतर तिसऱ्या सामन्यात पुन्हा मला मार्ग मोकळा करून द्यावा लागला. तेव्हाच माझी वेळ आता संपली आहे, हे मला समजलं', असं वक्तव्य अश्विनने केलं आहे.
advertisement
अश्विनचं करिअर
आर अश्विन हा टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधल्या टीम इंडियाचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. अश्विनने 106 टेस्टमध्ये 24.01 च्या सरासरीने 537 विकेट घेतल्या, याशिवाय त्याने 25.76 च्या बॅटिंग सरासरीने 3,503 रनही केल्या ज्यात 6 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 9:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 'मला बाहेर काढून त्याला घेतलं...', तडकाफडकी रिटायरमेंटनंतर टीम इंडियाच्या स्टारचा गौप्यस्फोट







